https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

परभणी न्यायालयाचा न्याय पूर्ण निवाडा अॅट्रोसिट्टीच्या आरोपातून ४ जन दोषमूक्त

मानवत / प्रतिनिधी.

दिनांक 3 9 2021 रोजी मानवत तालूक्यातील सावरगाव येथील फिर्यादी नामे छाया कचरुबा वाघमारे यांनी आरोपी नामे उत्तम आश्रुबा टरफले व त्याचे तीन मुलं यांच्या विरुद्ध आमच्या घरा समोरील शेळीचे पिल्ले का हुसकवतेस म्हणून जातिवाचक शिवीगाळ केल्या प्रकरणी मानवत पोलीस स्टेशन येथे *कलम 294 भादवी* व ॲट्रॉसिटी प्रतिबंधक कायदा अन्वय फिर्याद दिली होती त्या नंतर सदर प्रकरणाचा तपास एडिशनल एस.पी. अविनाश कुमार यांनी करून दोषारोपपत्र परभणी व जिल्हा सत्र न्यायालयात दाखल केले होते.
सदर प्रकरणात माननीय जिल्हा व सत्र न्यायालय परभणी यांनी एकूण सहा साक्षीदार तपासले त्यानंतर सुनावणी झाली व सरळ पुराव्या अभावी आरोपी नामे १) उत्तम अश्रोबा टरफले 2) संदीप उत्तम टरपले 3) योगेश उत्तम टरफले 4) अरुण उत्तम टरफले यांची *कलम 294 भादवी व कलम 3.( 1) (आर )एक्स ॲट्रॉसिटी प्रतिबंधक कायदा* अन्वय निर्दोष मुक्तता केली.
सदर प्रकरणात आरोपी तर्फे *मानवत येथील एडवोकेट व्ही आर चौधरी यांनी काम पाहिले* त्यांना *एडवोकेट हरिदास जाधव यांनी सहकार्य केले* व फिर्यादी पक्षाच्या वतीने *एजेपी बी.बी. घटे यांनी काम पाहिले.*एडवोकेट व्ही.आर.चौधरी* यांचे मित्र परिवारा मधून स्वागत होत आहे.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704