https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

नागपूर येथील ‘पेन्शन जनक्रांती महामोर्चात प्राध्यापकांनी सहभागी व्हावे :स्वामुक्टा

नांदेड: (डॉ.प्रवीणकुमार सेलूकर)
महाराष्ट्रातील सर्व शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी ‘महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या नेतृत्वात १२ डिसेंबर २०२३ रोजी नागपूर येथे हिवाळी अधिवेशन कालावधीत ‘पेन्शन जनक्रांती महामोर्चा’ आयोजित केला आहे.
महाराष्ट्र शासनाने १ नोव्हेंबर २००५
रोजी व नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांना
परिभाषित अंशदायी निवृत्तीवेतन योजना’सुरू केली. मात्र, मागील १८ वर्षातील या योजनेचे स्वरूप बघता ही योजना फसवी असून त्यातून सेवानिवृत्त कर्मचारी व त्यांचे
कुटुंबीयांना सामाजिक व आर्थिक स्थैर्य मिळत नाही. त्यामुळे १ नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त सर्व कर्मचाऱ्यांना म.ना.से.अधि. १९८२ व १९८४ अंतर्गत जुनीचपेन्शन योजना पूर्ववत लागू करावी अशी मागणी राज्यातील १७ लाख कर्मचाऱ्यांच्या वतीने सातत्याने विविध आंदोलने, मोर्चे,
उपोषणे, संप आदि माध्यमातून केली जात आहे.मागील वर्षी २७ डिसेंबर २०२२ रोजी दिड लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांनी पेंशन संकल्प यात्रा काढून नवीन पेंशन योजनेला विरोध केला होता. तसेच १४ ते २० मार्च २०२३ या कालावधीत राज्यातील १७ लाख कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शनच्या मागणीसाठी बेमुदत संप देखील केला होता. त्यावेळी शासनाकडून या अनुषंगाने एक समिती स्थापन करून तीन महिन्यांत याबाबत सकारात्मक निर्णय घेऊ असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र अद्याप या जुनी पेंशन लागू करण्याबाबत कोणताही निर्णय न झाल्यामुळे कर्मचारी वर्गात प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.
या आक्रोशाचा एक भाग म्हणून ‘महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना व नेतृत्वात १२ डिसेंबर २०२३ रोजी यशवंत स्टेडीयम ते विधानभवन नागपूर येथे ‘पेन्शन जनक्रांती महामोर्चा’ आयोजित करण्यात आला असून यामध्ये राज्यातील स कर्मचारी मोठया संख्येने सहभागी होणार आहेत. महाराष्ट्र प्राध्यापक महासंघ (एमफुक्टो) व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड अंतर्गत (एमफुक्टो) संलग्नित ‘स्वामुक्टा’ संघटनेच्या वतीने या महामोर्चाला सक्रीय पाठिंबा देण्यात आला आहे.स्वामुक्टा’चे सर्व पदाधिकारी व
प्राध्यापकांनी मोठ्या संख्येने या महामोर्चात सक्रीयपणे सहभागी व्हावे असे आवाहन संघटनेचे अध्यक्ष डॉ. सुर्यकांत जोगदंड,सचिव डॉ. विजय भोपाळे, कोषाध्यक्ष डॉ.

दिलीप पाईकराव, उपाध्यक्ष डॉ. डी. एन.मोरे, पेंशन समन्वयक डॉ. अमोल लाटे व केंद्रीय कार्यकारिणी पदाधिकारी डॉ. गोपाळ
मोघे, डॉ. टी.आर.फिसफिसे, डॉ. सुनील व्हावारे, डॉ. करुणा देशमुख, प्रा.डी.आर.भुरे, डॉ. गौतम दुथडे, डॉ. सुधीर वाघ, डॉ. किशोर हुगे, डॉ. जयद्रथ जाधव,डॉ. रामचंद्र भिसे, डॉ. नानासाहेब पाटील,डॉ. काशिनाथ चव्हाण, डॉ. प्रभाकरजाधव, डॉ.संजीव
अग्रवाल, डॉ.मनोजकुमार सोमवंशी, डॉ. रावसाहेब इंगळे, डॉ. बाळासाहेब गित्ते, डॉ. एस.आर. यादव यांनी केले आहे.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704