एम सी आर

इतिहासातील चुका मधून धडा घेतला तर भविष्यकाळ उज्वल ठरतो. प्राचार्य डॉ. सोमनाथ रोडे

Uncategorized

नांदेड: वर्तमानकाळातील वाटचालीसाठी इतिहास मार्गदर्शक ठरत असतो. भूतकाळामध्ये घडलेल्या चुका इतिहासाच्या अभ्यासातून टाळता येतात. त्या टाळल्या तर भविष्यकाळ उज्वल ठरतो. असे उद्गार महात्मा बसवेश्वर महाविद्यालय लातूर चे सेवानिवृत्त प्राचार्य तथा ज्येष्ठ इतिहास अभ्यासक डॉ.सोमनाथ रोडे यांनी यशवंत महाविद्यालय, नांदेड येथील पदवी व पदव्युत्तर इतिहास विभाग व संशोधन केंद्राच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील एम.ए. प्रथम वर्ष व बी.ए. प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी ‘UG & PG Induction Program 2026-27’ या ‘सत्रारंभ कार्यक्रमा’मध्ये ‘इतिहास विषयातील करिअर व संधी’ या विषयावर साधनव्यक्ती तथा प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना काढले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू तथा प्राचार्य डॉ. गणेशचंद्र शिंदे होते . एम.ए प्रथम व बी.ए. प्रथम वर्गाच्या विद्यार्थ्याकरिता सत्रारंभ कार्यक्रमाचे आयोजन दि. ६ ऑगस्ट २०२६ रोजी आयसीटी हॉल क्र. १४ येथे करण्यात आले होते. यशवंत महाविद्यालयात नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना इतिहास विषयातील अध्ययनाच्या विविध पैलूंबरोबरच उच्च शिक्षण, संशोधन व रोजगाराच्या उपलब्ध संधींची माहिती व्हावी, या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पुढे बोलताना डाँ. सोमनाथ रोडे म्हणाले की , इतिहास हा विषय शालेय स्तरापासून शिकवला जात असल्यामुळे शिक्षणाच्या क्षेत्रात व तसेच संशोधनाच्या क्षेत्रात मोठ्या संधी असल्याचे सांगितले. तसेच इतिहासात केवळ भूतकाळाचा अभ्यास करणारा विषय नसून त्यामध्ये विविध क्षेत्रात करिअरच्या अनेक संधी उपलब्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेशचंद्र शिंदे यांनी इतिहास विषयाचे स्पर्धा परीक्षेमध्ये असलेले महत्त्व अधोरेखित करत इतिहासाच्या विद्यार्थ्यांनी इतिहासातील मूळ ग्रंथांचे वाचन करावे अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच ते म्हणाले की, स्पर्धा परीक्षेसाठी इतिहास हा विषय निवडून अनेक विद्यार्थी मोठ्या पदावर गेले आहेत . तुम्ही ही अभ्यास करून स्पर्धा परीक्षेला सामोरे गेलात तर मोठ्या पदावर जाऊन मोठे अधिकारी होऊ शकता.
या कार्यक्रमाचे प्रस्ताविक इतिहास विभागप्रमुख डॉ. शिवराज बोकडे यांनी केले. त्यांनी प्रस्ताविकामध्ये इतिहास विभागाच्या शैक्षणिक, संशोधनात्मक व विद्यार्थी-केंद्रित उपक्रमांची माहिती देत नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत केले. डॉ. संगीता शिंदे यांनी प्रमुख साधनव्यक्ती प्राचार्य तथा जेष्ठ इतिहास अभ्यासक डॉ. सोमनाथ रोडे यांचा परिचय करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. साईनाथ बिंदगे यांनी केले, तर प्रा. राजश्री भोपळे यांनी आभार मानले.
या प्रसंगी प्रा. डॉ. शीतल सावंत यांच्यासह एम.ए. प्रथम वर्ष व बी.ए. प्रथम वर्ष इतिहास विषयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share

Related posts

प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे चार चिमुकल्यांचा बळी; कुटुंबीयांना २० लाख मदत द्या — डॉ. मुजाहिद खान

Chief Editor

शेतात खत, घरात एकमत आणि गावात पत निर्माण करणारी रेशीम शेती करावी – जिल्हा रेशीम अधिकारी अशोक वडवळे

Chief Editor

म.ज्योतिबा फुले हे महान क्रांतिकारक समाज सुधारक होते – प्रा. राहुल पुंडगे

Chief Editor

घरफोडी प्रकरणातील आरोपी १२ तासांत जेरबंद; १९.६१ लाखांचा मुद्देमाल जप्त

Chief Editor

ओशो ध्यान प्रयोगांद्वारे शांती, मौन, आनंदाची अनुभूती -डॉ.अजय गव्हाणे

Chief Editor

महादेव पिंपळगाव येथे अति आवश्यक संच वितरण कॅम्पमध्ये गोंधळ; बांधकाम कामगारांची गैरसोय

Chief Editor