एम सी आर

डोळस व सक्षम नागरिक होण्यासाठी राज्यशास्त्र आवश्यक -डॉ. दत्ताजी मेहत्रे

Uncategorized

नांदेड:( दि. ७ ऑगस्ट २०२६)
माणसाच्या प्रत्येक घडामोडीवर राज्य नियंत्रण ठेवते. राजकारणात इंटरेस्ट नाही; असे म्हणणारी व्यक्ती अव्यवहारिक आहे. डोळस व सक्षम नागरिक होण्यासाठी राज्यशास्त्र आवश्यक आहे. जीवन जगण्याचे आणि स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्याचे ज्ञान राज्यशास्त्र देते, असे प्रतिपादन नारायणराव चव्हाण लॉ कॉलेज येथील राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. दत्ताजी मेहत्रे यांनी केले.
यशवंत महाविद्यालयात राज्यशास्त्र सत्रारंभ सोहळ्यात ‘राज्यशास्त्रातील करिअरच्या संधी’ या विषयावर ते बोलत होते. याप्रसंगी विचारमंचावर माजी प्र-कुलगुरु प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन. शिंदे, राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. अजय गव्हाणे, डॉ.कविता सोनकांबळे, डॉ. विरभद्र स्वामी, डॉ. विश्वाधार देशमुख यांची उपस्थिती होती.
अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन. शिंदे यांनी, मानवीय आणि सामाजिक मूल्य ज्ञात होण्यासाठी राज्यशास्त्र आवश्यक आहे. सामाजिक मूल्यांचा आणि कायद्याचा उपयोग करून आपण समाजाला काय देऊ शकतो, याचा विचार प्रत्येक नागरिकाने करावा. पुस्तकातील आणि मस्तकातील ज्ञानामध्ये फरक असतो. ज्ञान केवळ पुस्तकी राहू नये, अशी भावना देखील व्यक्त केली.
प्रारंभी कु.आदिती अनलदास यांनी भारतीय संविधान प्रास्ताविकेचे वाचन केले. सूत्रसंचालन कु.मोहिनी लिंगायत यांनी केले. प्रमुख अतिथींच्या परिचय कु.वैष्णवी गोरे यांनी करून दिला. शेवटी आभार कु.समीक्षा वाघमारे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अविनाश तारू, अर्जुन देशमुख, राजशेखर गादेवार, रामेश्वर शिंदे, डॉ. अजय मुठे, डॉ.डी.डी.भोसले, डॉ.ज्ञानेश्वर पुपलवाड, डॉ. प्रवीणकुमार सेलूकर, प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक गजानन पाटील, जगन्नाथ महामुने, नाना शिंदे यांनी सहकार्य केले.

Share

Related posts

उद्योजक व ध्यानसाधनेचे मिश्रण: सुरेश धूत (लेखक:डॉ. अजय गव्हाणे)

Chief Editor

स्वारातीम’ विद्यापीठात नेट-सेट-गेट मार्गदर्शन कार्यशाळेचे उद्घाटन

Chief Editor

सामाजिक समता सप्ताहाचा उत्साहात शुभारंभ; फुले-आंबेडकर विचार आचरणात आणा – कुलगुरू डॉ मनोहर चासकर

Chief Editor

जातीनिरपेक्ष व धर्मनिरपेक्ष व्यक्तिमत्व : डॉ.गौतम दुथडे* (-लेखक: डॉ.अजय गव्हाणे)

Chief Editor

विद्यार्थीप्रिय आदर्श प्राध्यापक: प्रा. डॉ. वसंत गुरव :

Chief Editor

यशवंत ‘मध्ये दुग्धशास्त्र विभागाचा इंडक्शन प्रोग्राम संपन्न

Chief Editor

Leave a Comment