एम सी आर
Uncategorized

माय मराठीचा समृद्ध वारसा जपण्यासाठी ज्ञानवन प्री स्कूलची स्थापना

नांदेड – जागतिक दर्जाच्या शैक्षणिक सोयीसुविधा आणि आपल्या संस्कृतीचा वारसा यांचा मेळ घालणाऱ्या एका मराठी (सेमी-इंग्रजी) पूर्व-प्राथमिक शाळा शहरातील हनुमानगड भागात आकारास येत आहे. ज्ञानवन प्री स्कूल ही केवळ शाळा नसून बालमनांवर संस्कार व माय मराठीची घट्ट पेरणी करण्याचा मानस संचालिका पूर्णिमा श्रीवास्तव व सरिता कंठेवाड यांनी पत्रपरिषदेत व्यक्त केला.
मुलं जेव्हा त्यांच्या मातृभाषेतून शिकतात, तेव्हा ती केवळ ‘अक्षरं’ वाचत नाहीत, तर ती ‘जगणे’ शिकतात. त्यांना ज्ञानेश्वरांची समृद्धता, शिवरायांचे शौर्य आणि महाराष्ट्राच्या मातीतील संस्कार सहज उमजतात. इंग्रजी ही केवळ एक भाषा आहे, ती ‘ज्ञानाचे माध्यम’ असू शकते, पण ‘संस्कारांचे मूळ’ केवळ मातृभाषाच असते. मराठी आता केवळ एक प्रादेशिक भाषा राहिलेली नसून ती एक अभिजात भाषा बनली आहे. तब्बल २ हजार वर्षांपेक्षा जुना व समृद्ध इतिहास लाभलेल्या या मायबोलीचा वारसा जपत असताना, काळाची गरज व जागतिक पातळीवरील आव्हानांसाठी पुढची पिढी तयार करण्यासाठी बालवयात बहुभाषिकतेचे संस्कार महत्त्वपूर्ण ठरतात. त्यासाठी ‘ज्ञानवन’ पूर्व-प्राथमिक शाळेत आगळ्यावेगळ्या संकल्पनेचा प्रयोग राबविण्यासाठी तज्ज्ञ मार्गदर्शक व बालस्नेही शिक्षकांना पाचारण केले आहे.
२ एप्रिल रोजी शाळेचा शुभारंभ होत असून आनंदवन, अंकुरवन, पल्लववन, कुसुमवन अशा चार वर्गांत विद्यार्थ्यांवर संस्कार केले जाणार आहेत. बालस्नेही वातावरण, डिजिटल क्लासरूम, ऑडिओ-व्हिडिओ रूम, स्वतंत्र भोजन कक्ष, प्लेइंग एरिया, आवडी-निवडी जोपासण्यासाठी स्वतंत्र म्युझिक, डान्स व आर्ट स्टुडिओ येथे उभारण्यात आला आहे. पालकांचा सहभाग वाढविण्यासाठी आठवड्यातून एकदा त्यांच्यासमवेत डब्बा पार्टी व गप्पांची मैफल भरविली जाणार आहे.
शिवाय राष्ट्रगीत, प्रतिज्ञेसोबत संविधानाच्या प्रस्ताविकेचे वाचन, मराठी-इंग्रजी भाषेची रोटेशन पद्धतीने ॲक्टिव्ह बोर्डच्या माध्यमातून शिकवणी दिली जाणार आहे. शाळेचा शुभारंभ सोहळा २ एप्रिल रोजी होणार असून यावेळी प्रसिद्ध साहित्यिक देवीदास फुलारी, प्रथितयश लेखिका तथा समाजसेविका ॲड. दिपा बियाणी, शिक्षणाधिकारी दिलीप बनसोडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
शिक्षणप्रिय व मराठीचा अभिमान बाळगणाऱ्या प्रत्येकाने या सोहळ्यास उपस्थित राहावे, असे आवाहन अभिजात मराठी प्रतिष्ठान व ज्ञानवन परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे. सदर पत्रकार परिषदेस ज्येष्ठ उद्योजक पंढरीनाथ कंठेवाड यांच्यासह शाळेच्या प्राचार्या, शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते.

Share

Related posts

दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागात जागतिक वारसा दिन उत्साहात साजरा

Chief Editor

बदलत्या जीवनशैलीत योग्य आहाराचे महत्त्व – मीरा धुळगुंडे”

Chief Editor

स्वारातीम’ विद्यापीठामध्ये संत रविदास महाराज यांची जयंती साजरी

Chief Editor

सर्वज्ञ संचित’ ग्रंथाचे रविवारी प्रकाशन

Chief Editor

अर्थशास्त्रातील करिअर संधीवर प्राध्यापक सागर कोंडेकर यांचे मार्गदर्शन कौशल्य विकासावर भर देण्याचे आवाहन

Chief Editor

इतिहासातील चुका मधून धडा घेतला तर भविष्यकाळ उज्वल ठरतो. प्राचार्य डॉ. सोमनाथ रोडे

Chief Editor

Leave a Comment