परभणी: प्रतिनिधी
कै सौ कमलताई जामकर महिला महाविद्यालय, परभणी यांच्या आयोजनाखाली स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड अंतर्गत आंतरमहाविद्यालयीन क्रीडा स्पर्धा डी-झोन २०२६–२७ च्या वार्षिक नियोजन बैठकीचे यशस्वी आयोजन दि 05 बुधवार रोजी महाविद्यालयात करण्यात आले.
या बैठकीस परभणी व हिंगोली जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांच्या क्रीडा संचालकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. विविध क्रीडा स्पर्धांच्या आयोजनासाठी इच्छुक महाविद्यालयांनी प्रस्ताव सादर केले. त्यानुसार संबंधित महाविद्यालयांना स्पर्धांचे वाटप करण्यात आले. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. रामचंद्र भिसे, अध्यक्ष डी झोन, हे होते, प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. मीनानाथ गोमचाळे व डॉ. पवन बाराहाते, डॉ. विनोद गणाचार्य व डॉ. चंद्रकांत सातपुते हे मान्यवर यांची उपस्थिती होती . डी झोन मधील सेवानिवृत्त क्रीडा संचालक डॉ. कमलाकर कदम ( सेलू ) व डॉ. साहेबराव देवकाते( औढा)यांचा त्यांच्या क्रीडा क्षेत्रातील कार्याबद्दल डी झोन समितीद्वारे सेवानिवृती निमित सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संयोजन डॉ. अभिजीत सरनाईक (सचिव, डी- झोन व क्रीडा संचालक, कै. सौ कमलताई जामकर महाविद्यालय, परभणी) यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. महेश जाधव यांनी केले.
सर्व आयोजक महाविद्यालयांना आगामी आंतरमहाविद्यालयीन क्रीडा स्पर्धांच्या यशस्वी आयोजनाचा कार्यक्रम निश्चित केला. स्पर्धाच्या आयोजनास मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत💐
