https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
आपला जिल्हा

आ.सुधाकर अडबाले यांनी घेतली शिक्षण विभागाची सभा

गडचिरोली,प्रतिनिधी :-

गडचिरोली शिक्षण विभागाची प्रथमच बैठक शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांनी जिल्हा परिषद गडचिरोली येथे प्राथमिक व माध्यमिक विभागाच्या समस्यांबाबत शिक्षणाधिकारी (प्राथमिक) व (माध्यमिक) यांच्या सोबत बैठक घेतली.

यावेळी मार्च पेड इन एप्रिलच्या सर्व लेखाशीर्षामधील शाळा /कनिष्ठ महाविद्यालयाच्या वेतन अनुदानाबाबतची सद्यस्थिती, आधार व्हॅलिड – इनव्हॅलिड, सेवानिवृत्त शिक्षक / कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगाच्या तीन हप्त्यांबाबतची सद्यस्थिती, वैद्यकीय प्रतिपूर्ती देयके अदा करणे, एरिअस देयके अदा करणे, रजा रोखीकरण, सेवानिवृत्ती प्रकरणे, एनपीएस खातेधारकांना देय असलेला सातवा वेतन आयोगाच्या हप्त्याबाबत चर्चा, एनपीएस खाते नसलेल्या कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाची  हप्ते अदा करणे, पेन्शन मंजुरीनंतर उपदान अदा करण्यात होत असलेला विलंब, प्रलंबित वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणीच्या प्रकरणाबाबत चर्चा करणे, रिक्त पदे भरण्याबाबत चर्चा, शालेय पोषण आहार, अनुकंपा, पदोन्नती, पात्र शिक्षकांना निवडश्रेणी मंजूर करणे, केंद्रप्रमुख/ उ.श्रे. मुख्याध्यापक पदोन्नती करणे व इतर अनेक प्रलंबित समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या प्रलंबित समस्या लवकरात लवकर निकाली काढाव्या, अशा सूचना आमदार सुधाकर अडबाले यांनी शिक्षण विभागास केल्या.

यावेळी शिक्षणाधिकारी (माध्य.) मान. राजकुमार निकम, शिक्षणाधिकारी (प्राथ.) विवेक नाकाडे, वैभव बारेकर, अधीक्षक दिलीप मेश्राम, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष दत्तात्रय खरवडे, कार्यवाह तथा सिनेट सदस्य अजय लोंढे, जिल्हा कार्याध्यक्ष कैलास भोयर, महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समिती राज्यनेता विजय भोगेकर तथा विमाशी, प्राथमिक शिक्षक समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704