एम सी आर
Uncategorized

सर्वज्ञ संचित’ ग्रंथाचे रविवारी प्रकाशन

नांदेड:(दि. १२ जून २०२६)
महानुभाव साहित्याचे अभ्यासक व यशवंत महाविद्यालयातील मराठी विभागप्रमुख डॉ.संजय जगताप लिखित ‘ सर्वज्ञ संचित ‘ या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा रविवारी, दि. १४ जून सकाळी १०:०० वाजता यशवंत महाविद्यालयातील ग्रंथालय सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. मा. मा. जाधव भूषविणार असून मेरठ (उत्तर प्रदेश) येथील प्रसिद्ध साहित्यिक व महानुभाव साहित्याचे भाष्यकार डॉ. बाबासाहेब बिडकर यांच्या हस्ते ग्रंथाचे प्रकाशन होणार आहे. याप्रसंगी मराठी भाषा विद्यापीठ, नागपूर येथील अधिष्ठाता डॉ. कोमल ठाकरे या ग्रंथावर भाष्य करणार असून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर येथील श्री.चक्रधर स्वामी अध्यासन केंद्राचे प्रमुख डॉ.भारतभूषण शास्त्री व महानुभाव साहित्याचे अभ्यासक यांचेही भाष्य श्रोत्यांना ऐकायला मिळणार आहे. या ग्रंथावर सविस्तर मत अमरावती येथील प्रा. संदीप तडस व्यक्त करणार आहेत.
डॉ. संजय जगताप हे महानुभाव साहित्याचे अभ्यासक असून त्यांचे आजवर आठ ग्रंथ प्रकाशित झालेले आहेत. ‘ सर्वज्ञ संचित’ हे श्री. चक्रधर स्वामींच्या सूत्रावर आधारित असलेला ग्रंथ सायास पब्लिकेशन, नांदेड यांनी प्रकाशित केला असून प्रकाशन सोहळा दि. १४ जून रोजी श्री.शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयातील ग्रंथालय सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.
या प्रकाशन सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजक डॉ. माधव जाधव, डॉ. हंसराज जाधव, डॉ. सूर्यप्रकाश जाधव, डॉ. व्यंकटी पावडे, डॉ.कमलाकर चव्हाण, डॉ. शारदा कदम, प्रा.रामदास बोकारे यांनी केले आहे.

Share

Related posts

हिंदी भाषेची जागतिक पटलावर सशक्त उपस्थिती* -डॉ. बसवेश्वर बेंद्र

Chief Editor

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात आंतरराष्ट्रीय खगोलभौतिकी परिषद

Chief Editor

प्रा.ओमप्रकाश गुंजकर यांचे सागरी जलतरण स्पर्धेतील सुयश आनंददायी -माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण

Chief Editor

नांदेड जिल्हा निर्यातीसाठी अग्रस्थानी नेणार – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chief Editor

यशवंत महाविद्यालयात गुंतवणूकदार जागरूकता कार्यक्रम; विद्यार्थ्यांना सुरक्षित गुंतवणुकीचे मार्गदर्शन

Chief Editor

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेचा लाभ मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक नोंदणी व आधार प्रमाणीकरण तातडीने पूर्ण करावे – सहाय्यक निबंधक अशोक राठोड यांचे आवाहन

Chief Editor

Leave a Comment