सामाजीक
गामाच्या वतीने दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन

गडचिरोली,प्रतिनिधी :-
डिजीटल मिडीया व वृत्तपत्र क्षेत्रात कार्यरत असलेल्या गडचिरोली ऑल मिडीया असोसिएशन (गामा ) च्या वतीने पत्रकार दिनाचे औचित्य साधून दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले.
मराठी पत्रकारीतेचे जनक, थोर समाजसुधारक तथा लोकशिक्षणाचे आद्य प्रवर्तक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी रोजी १८३२ रोजी दर्पण नावाचे पहिले मराठी वृत्तपत्र सुरू करून वृत्तपत्र सृष्टीची मुहूर्तमेढ रोवली. तेव्हापासून ६ जानेवारी हा दिवस दर्पनकार यांची आठवण म्हणून हा दिवस पत्रकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो.