https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
आपला जिल्हा

गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसी आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावा

 गडचिरोली,प्रतिनिधी :-

भारत सरकारच्या मागासवर्ग (ओबीसी)आयोगाचे अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री हंसराज भैय्या अहिर यांनी अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर स्व गावी आल्यावर त्यांची चंद्रपूर येथे जाऊन त्यांची भेट घेत  त्यांचे पुष्गुच्छ देवून स्वागत केले. ओबीसी समाजाची जनगणना,जिल्ह्यात ओबीसी समाजाला २७ टक्के आरक्षण, ५०%हून अधिक गैर आदिवासी असणाऱ्या गावांमध्ये असलेला पेसा कायदा यासह विविध मुद्द्यांवर केली चर्चा यावेळी गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर चर्चा करीत अन्यायग्रस्त या समाजाला न्याय देण्याची विनंती आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी हंसराज भैय्या यांना केली. 

यावेळी भाजपाचे जिल्हा महामंत्री ओबीसी नेते प्रमोदजी पिपरे ,माजी नगराध्यक्ष सौ योगिताताई पिपरे, गडचिरोली शहराचे अध्यक्ष मुक्तेश्वरजी काटवे,ओबीसी आघाडीचे जिल्हा महामंत्री भास्करराव बुरे, तालुक्याचे अध्यक्ष दिलीप चलाख, नगरसेवक केशवजी निंबोड , पंचायत समितीचे माजी सभापती  मारोतरावजी ईचोडकर उपसभापती विलासराव दशमुखे,  बंगाली आघाडीचे जिल्हा अध्यक्ष सुरेश शहा , जिल्हा महामंत्री सुशांत जी रॉय माजी नगरसेविका वैष्णवीताई नैताम,  शहराच्या अध्यक्षा सौ. कविताताई उरकुडे, तालुक्याचे महामंत्री साईनाथजी बुरांडे ,हेमंत बोरकुटे , भोजराज भगत, युवा मोर्चाचे प्रतिक राठी, ओबीसी आघाडीचे शेषरावजी कोहळे यांचे सह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.  

गडचिरोली जिल्ह्यात मागील अनेक वर्षापासून ओबीसी समाजावर सातत्याने अन्याय होत असून ओबीसी समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित आहे. त्यामुळे जिल्ह्यातील या समाजाला उच्च  शिक्षण व नोकरीच्या संधी मिळण्यास अडचणी निर्माण होत आहे. जिल्ह्यात ओबीसी समाजाची संख्या जाणून घेण्यासाठी या समाजाची जनगणना होणे  आवश्यक  आहे. ज्या गावांमध्ये ५०% हून अधिक गैर आदिवासी समाजाची संख्या आहे त्या गावांना पेसा मुक्त करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले

यावेळी झालेल्या चर्चेत आमदार डॉक्टर देवराव जी होळी यांनी हंसराज भैय्या  अहिर यांना  गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसी समाजाच्या समस्या जाणून घेण्यासाठी गडचिरोली ला येण्याचे निमंत्रण दिले.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704