https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
महाराष्ट्र

ठाकर अनुसूचित जमातीतील 3 विद्यार्थ्यांना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा

औरंगाबाद,प्रतिनिधी :-

मुंबई उच्च न्यायलय,खंडपीठ,औरंगाबाद ने ठाकर अनुसूचित जमातीतील 3 विद्यार्थ्यांना दिलासा देत त्यांना तात्काळ वैधता प्रमाणपत्र देण्याचे आदेश पारित केले. या न्याय निर्णयाने ठाकर जमातीला दिलासा मिळाला असून समितीला न्यायालाने फटकारले आहे.

अर्जदार 1.जितेंद्र अरुण मोरे सोलापूर (WP.2346 of 2020),2.जान्हवी संतोष मस्के सिंधुदुर्ग (WP.12097 of 2022),3.श्रुतिका बापू पवार,पुणे (WP.7584 of 2022) वरील सर्व याचिकाकर्त्या विद्यार्थ्यांचे ठाकर अनुसूचित जमातीचा दावा समितीने मराठा /भाट /कुणबी /मराठी अशा नोंदीवरून रद्द केले असता त्यांनी जेष्ठ विधिज्ञ ॲड.सुशांत येरमवार साहेबांमार्फत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.

न्या.एस.जी.गंगापूरवाला आणि न्या.एस.एन.लड्डा यांच्या पीठासमोरील सुनावणी मध्ये जुन्या ठाकर नोंदी,घरातील वैधता,उच्च न्यायालयाचे आणि सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी दिलेल्या निर्णयाचे दाखले दिले असता न्यायालयाने समितीचे सर्व आदेश रद्द करून सर्वाना तात्काळ वैधता प्रमाणपत्र देण्याचे आदेश दि.18.10.2022 रोजी पारित केले.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704