https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
सामाजीक

नवसाला पावणारी कारगिल चौक ची देवी

गरबा दांडिया ला प्रतिसाद

गडचिरोली,प्रतिनिधी :-

नवसाला पावणारी कारगिल ची देवी गडचिरोलीच्या कारगिल चौक येथील दुर्गा देवी ही भाविकांचे नवस पूर्ण करते अशी श्रद्धा आहे.याच परिसरात गंगा मातेचे जागृत देवस्थान आहे. शहरातील सुप्रसिद्ध 

कारगिल चोक दुर्गा उत्सव मंडळ ची स्थापना 1999 ला झाली. कारगिल युद्ध दिवशी याच वर्षी
झाले होते. याच वर्षी दुर्गा उत्सव मंडळाने कारगिल युद्धावर एक मोठा देखावा तयार केला होता.हा देखावा बघण्याकरता शहरात खेड्यापाड्यातून आणि अन्य जिल्ह्यातून येत मोठ्या संख्येने
येत होते. यामुळे या चौकाचे नाव कारगिल चौक गडचिरोली असे ठेवण्यात आले. या मंडळाचे अध्यक्ष उदय धकाते यांच्या पुढाकाराने या चौकाचे नामकरण कारगिल चौक गडचिरोली असे केले विशेष म्हणजे गडचिरोली शहरात
नगरपरिषदेने पहिल्यांदाच ठराव घेऊन या चौकाला अधिकृत
मान्यता प्रदान केली. कारगिल चौक दुर्गा उत्सव मंडळ तर्फे दरवर्षी मोठ्या उत्साहात येथे नवरात्र उत्सव साजरा होतो. मंडळतर्फे दुर्गा मातेच्या मूर्तीची स्थापना करण्यात येते दरवर्षी हे मंडळ सामाजिक उपक्रम राबवते. 26 जुलैला कारगिल विजय दिवस साजरा करण्यात येतो. या दिवशी शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात येते. मंडळ तर्फे आरोग्य शिबीर सुद्धा घेण्यात येतो. दरवर्षी इथे धार्मिक व देशभक्ती पर प्रबोधणात्मक देखावे तयार करण्यात येते. सदर देखावे बघण्यासाठी नागरिकांची मोठी रिघ लागलेली असते. महिलासाठी ओटी सजावट स्पर्धा ही नित्यानेमाने आयोजित होत असते.

दुर्गा उत्सव निमित्याने अनेक भाविक इथे दर्शनाला येतात इथे देवीला नवस बोलला जातो आणि हा पूर्ण होतो असा अनेक भाविकांचा समज आहे.

या मंडळाचे वैशिष्ट्य हे की दरवर्षी, इथे कुणी ना कोणी भाविक दुर्गा मातेची मूर्ती भेट देत असतो. यावर्षी सुद्धा देवीची मूर्ती भेट स्वरूपात प्राप्त झाली आहे.
कारगिल चौक दुर्गा उत्सव मंडळाचे अध्यक्ष उदय  धकाते हे मागील 21 वर्षापासून या चौकामध्ये कारगिल युद्धातील शहीद जवानांच्या स्मृतीपित्यार्थ इथे एक अमर जवान, च्या धरतीवर इथे स्मारक व्हावे यासाठी प्रशासना कडे पाठपुरावा करत होते त्यांच्या या
प्रयत्नाला यश प्राप्त झाले इथे भव्य दिव्य कारगिल स्मारक
तयार झालेले आहे हे स्मारक गडचिरोलि शहरातील आकर्षणाचे केंद्रबिंदू बनले आहे.
यावर्षी मंडळने गरबा दांडिया उत्सव प्रथमच आयोजित केला आहे.

मंडळचे अध्यक्ष उदय धकाते यांच्या कुशल नेतृत्वखाली सचिव प्रकाश भांडेकर,उपाध्यक्ष रेवनाथ गोवर्धन, कोषाध्यक्ष प्रकाश धकाते मार्गदर्शक म्हणून् कन्हेयासिन्ह बैस, नरेंद्र चनावार, सुनील देशमुख, डॉ. नरेश बिडकर,मोबीन सय्यद, किशोर सोनटक्के,मोतीराम हजारे,सुभाष माधमशेट्टीवार,मनीष हांडे,विकी डोंगरे,राजू डोंगरे,विजय लोणारे, सौ. रेखाताई हजारे,सौ सुचिता धकाते,सौ नीलिमा देशमुख, श्रीमती मंगला गोधनकर, सौ वनिता भांडेकर, सौ.प्रेमिला कुंभारे,सौ. विद्या कुमरे,सौ. वनिताधकाते,श्रीमतीघुगुस्कर,सौ.काकपुरे,सौ.लाकडे,सौ.वनिता वाडिघरे,सौ.संगीता धकाते आदी सदस्यगन आहे.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704