https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

नेसूबो होली लोटस शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन नृत्य अविष्काराने साजरे.

नांदेड:

अभिनव भारत शिक्षण संस्था संचलित नेताजी सुभाषचंद्र बोस होली लोटस इंग्लिश मीडियम शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठया उत्साहात साजरे झाले. शाळेच्या परंपरेनुसार विशिष्ठ संकल्पनेवर आधारित स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या वर्षी ऐकून २२ नृत्य अत्यंत सुंदर पद्धतीने सादरीकरण करून नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयाच्या स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न केले. या वेळी अभिनव भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. बालासाहेब पांडे यांची अध्यक्षस्थानी उपस्थिती होती तसेच संस्थेच्या सचिवा ॲड. सौ. वनिताताई जोशी, खजिनदार श्री. कैलासचंद काला, सदस्या सौ. अनिताताई बावणे, प्राचार्य डॉ. सुधिर शिवनीकर, डॉ. रवींद्र जोशी, डॉ. दीपक कासराळीकर, डॉ. मुकुंद गिरगावकर, डॉ. नंदकुमार साकरकर, डॉ. मनिष देशपांडे आदि मान्यवर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्तिथ होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेच्या सदस्या सौ. अनिता बावणे यांनी केले तर उद्घाटन सोहळ्यात बोलताना डॉ. रवींद्र जोशी यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नावाने असलेल्या या होली लोटस स्कूलची नावामध्ये असलेली विविधता उपस्थितांना सांगून सर्व चिमुकल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. या स्नेहसंमेलन सोहळ्यात सर्व विद्यार्थ्यांनी ऐकून २२ नृत्य अविष्कार सादर करून उपस्थितांची वाहवा मिळविली. या मध्ये आमच्या पप्पानी गणपती आणला, आय लव माय इंडिया, गुलाबी शरारा, लुंगी डान्स, छबीदार छबी, कोळी नृत्य, नाटो नाटो, आंख मारे, लावणी, चॉकलेटचा बंगला, काचा बदाम आदि गीतावर या सर्व चिमुकल्यांचे 22 नृत्यप्रकार सादर झाले हे सर्व नृत्यप्रकार पाहून कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. बालासाहेब पांडे यांनी सर्व चिमुकल्यांना शुभेच्छा देवून हे स्नेहसंमेलन अंतर्मुख करणारे होते असे प्रतिपादन आपल्या अध्यक्षीय भाषणात केले. उद्घाटन सत्राचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. संदीप काळे यांनी केले तर उर्वरित कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. मयुरी जोशी व सौ. सुमती पिनोजी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेच्या सदस्या सौ. अनिता बावणे यांच्या मार्गदर्शनाखाली सौ. हेमा जोंधळे, राजश्री राठोड, रेणुका पांडे, सुलोचना कऱ्हाले, रचीता कोटगिरे, अनिल देशपांडे, सौ. सुनंदा चौडेकर, मयुरेश विष्णुपुरीकर आदींनी परिश्रम घेतले.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704