https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
सामाजीक

देश विदेशात आज़ादी चा नवा पर्व सह गांधी विचाराचा विविध कार्यक्रम राबविणार

गडचिरोली,प्रतिनिधी :-

महात्मा गांधी अंतरराष्ट्रीय विचार मंचच्या महत्वाची सभा आज महात्मा गांधी अंतरराष्ट्रीय विचार मंच चे अंतरराष्ट्रीय संयोजक आणि संस्थापक विश्व शांतिदूत प्रकाश आर अर्जुनवार यांच्या अध्यक्षते खाली गढचिरोली येथिल शासकीय विश्रामगृहात संपन्न झाली. 

सभेत महात्मा गांधी अंतरराष्ट्रीय विचार मंचाचे महात्मा गांधी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर विचार प्रकोष्ठ चे राष्ट्रीय संयोजक वरीष्ठ सामाजिक कार्यकर्ता आणि पत्रकार श्री रोहिदास राऊत, श्री गुरुदेव सत्संग मंडल चे अध्यक्ष वरिष्ठ गांधीवादी डॉ एस.बी. कुंभारे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व गांधी विचारक संयोजक प्रा. पुंडलिकराव पूड़के, संगठणेचे नशामुक्त राष्ट्र अभियान प्रकोष्ठ चे जिल्हा संयोजक गोवर्धन चौहान, जिल्हा संयोजक मनोहर हेपट, प्रा.विलासराव निंभोरकर, सामाजिक कार्यकर्ता मुनिश्वर बोरकर, जिला संयोजक विलास बल्लमवार प्रामुख्याने उपस्थित होते. प्रा. देवानंद कामड़ी व आदिवासी समाजाचे समाजसेवक वसंतराव कुलसंगे सह अनेक पदाधिकारी मोबाईल द्वारे उपस्थित होते.

सभेत विशेष उल्लेखनीय असे की महात्मा गांधी अंतरराष्ट्रीय विचार मंच द्वारे सर्वाच्या प्रत्यक्ष अप्रत्यक्ष योगदान आणि सहकार्याने गडचिरोली जिल्हात आणि देश विदेशात अनेक लहाण मोठे कार्यक्रम संपन्न झाले आहे.

त्याप्रमाणे आज च्या सभेत उपस्थित पदाधिका-यांच्या  विचाराने आगामी कार्यक्रमाच्या रूपरेषा तैयार करूण खालील प्रमाणे कार्ययोजना ठरविण्यात आली. त्यात ९ अगस्त क्रांति दिन 2022 ते 30 जनवरी 2023 सहा महिणा पर्यंत संगठणेद्वारे देश विदेशात आज़ादी चा नवा पर्व साजरा करण्याचा ठरविण्यात आले.

यामध्ये 9 आगष्ट 2022 रोजी विविध ठिकाणी विशेष कार्यक्रमाचा आयोजन व गढचिरोली ते राष्ट्रपिता महात्मा गांधी आश्रम सेवाग्राम वर्धा पर्यंत सत्य शांति समानता यात्रा काढ़णे, शाळा महाविद्यालयात विघार्थ्यामध्ये गांधी विचार व दर्शन चा प्रचार करणे, गडचिरोली जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यात तसेच देश  (आदिवासी बहुल अंचल व नक्सलग्रस्त भागासह) विदेशात सत्य, शांति, अहिंसा, विश्व बंधुत्व, आर्थिक समानता,पर्यावरणीय, नशामुक्त राष्ट्र अभियान चालविणे, सामाजिक विकास व देशपातळीवरची समस्या वर सत्याग्रह करणे, गढचिरोली जिल्हासह विविध राज्यातील सामाजिक कार्यकर्त्यांचा सम्मान करणे, जिल्हासह देश विदेशात शांतिदूत बनविणे, गांधी विचार व दर्शन चा शांतिपथ नावाचा पत्रिका काढ़णे तसेच भारत देशात प्रेसिंडेट ला राष्ट्रपति या नावाने संबोधन करण्याऐवजी दुरूस्ती करूण राष्ट्राध्यक्ष संबोधले जावे असी मांगणी चा माननीय महामहिम राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री श्री नरेन्द्र मोदी तसेच लोकसभा अध्यक्ष श्री ओम बिरला ला संगठणेचे शिष्टमंडल द्वारे भेटण्याचा प्रयत्न करूण किंवा पत्र व्यवहार करणे इत्यादि विषयावर चर्चा करुण कार्यक्रम निश्चित करूण कार्ययोजना ठरविण्यात आले.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704