ताज्या घडामोडी
वक्फ बिलच्या निषेधार्थ मानवत तहसीलदार यांच्या मार्फत राष्ट्रपतींना निवेदन

मानवत / प्रतिनिधी.
मानवत येथील ऑल इंडिया मुस्लिम वक्फ बोर्ड मानवत यांच्या वतीने केंद्र सरकारच्या प्रस्तावित वक्फ सुधारणा विधेयकाचा निषेध नोंदवण्या साठी मानवत तहसिलचे तहसीलदार यांच्या मार्फत महामहिम राष्ट्रपती महोदय यांना निवेदन देण्यात आले.
सविस्तर वृत्त असे की,
या प्रसंगी मानवत येथील मुस्लिम समाजाचे धर्मगुरू आणि स्थानिक नेते उपस्थित होते. यावेळी मौलाना मुजाहिद, हाफेज लतीफ, मौलाना असलम, हाफिज अकबर, मौलाना असलम काझी, हाफेज आयाज ,हाफेज अबरार, उमर कुरेशी,यांचा समावेश होता. त्याबरोबर मानवत नगर परिषदेचे माजी नगरसेवक रहीम भाई बागवान, नियामत खान, व शगीर खान ,यांनी सहभाग नोंदवला.
यावेळी दिलेल्या निवेदनाच्या माध्यमातून केंद्र सरकारचा निषेध नोंदविण्यात आला सरकारने मुस्लिम समाजाच्या भावनांचा सन्मान राखावा, अशी मागणी करण्यात आली.
**



