https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
आरोग्य व शिक्षण

नवीन मेडिकल कॉलेज करिता खाजगी जमीन संपादित करण्यासाठी निधी उपलब्ध करून द्या-आमदार डॉ.देवरावजी होळी

गडचिरोली,प्रतिनिधी

गडचिरोली येथे बहुतांश उपलब्ध जागा ही वनविभागाची असल्याने मंजूर झालेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी ती सहजासहजी उपलब्ध होऊ शकणार नाही.  त्यासाठी बराच कालावधी जाईल त्यामुळे या परिसरात उपलब्ध असणारी खाजगी जागा संपादित करून त्यासाठी लागणारा निधी  उपलब्ध करून द्यावा अशी मागणी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे  निवेदनाद्वारे केली आहे 

गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्य विषयक परिस्थिती लक्षात घेता आपल्या पहिल्याच दौऱ्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री  देवेंद्रजी फडणवीस यांनी गडचिरोली येथे मेडिकल कॉलेज मंजुरीची घोषणा केली.

आता हे कॉलेज लवकरात लवकर सुरू व्हावे याकरिता पुढील प्रक्रिया पार पाडणे आवश्यक असून त्याकरिता लागणारी जमीन संपादित करणे आवश्यक आहे. परंतु या परिसरात बहुतांश जमीन ही वनविभागाची असल्याने ही जमीन संपादित करताना अनेक अडचणी येऊन त्यासाठी बराच कालावधी जाण्याची शक्यता आहे. करिता जी खाजगी जागा परिसरात उपलब्ध असेल ती जागा संपादित करून त्यासाठी लागणारा निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी मुंबई येथे राज्याचे  उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे केली आहे.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704