https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
साहित्यिक

समाजभान राखण्यासाठी विधायक व कृतिशील कार्याची गरज-संजय ढवस

चंद्रपूर,प्रतिनिधी :-

समाजातीतलं दा्तृत्व लोप पावलेले नसून कृतिशील व विधायक कार्य असेल तर समाजातील दा्तृत्व निश्चितच  सहकार्य करण्यास पुढे येते असे प्रतिपादन चंद्रपूरातील उद्योजक मा. संजय ढवस यांनी विकलांग सेवा संस्था चंद्रपूरच्या क्रीडा साहित्य वितरण व सॅनिटरी नॅपकिन व वस्त्र वितरण उपक्रमात केले.

     मुंबईच्या कॅमफोर्थ फौंडेशनच्या शेरील गायकवाड यांनी चंद्रपूर परिसरात ग्रंथ वाचन, मुक्त वृत्तपत्र वाचन व आरोग्य स्वछता सदरात वरील साहित्य उपलब्ध करून दिले.

    संजय ढवस पुढे असेही म्हणाले की व्यवसायातील निवडक वाटा उद्योजकानी सामुदायिक विकास उपक्रमाकरिता पुढे येतात मात्र विनियोग व्हायला हवा.

  या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रसाद पान्हेरकर यांनी केले तर आभार देवराव कोंडेकर यांनी मानले.

  यावेळी मदतीचा  हात  संस्थेच्या प्रणाली गुरुपूडे, रवी राठोड तसेच माला रामटेके,उर्मिला भागडे, शारदा ढोमणे,अशोक खाडे, शिवानी बोबडे, पूजा चहारे/पान्हेरकर,  वर्षा कोठेकर  इत्यादीनी उपस्थिती व सहभाग  दर्शवीला.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704