मानवतला आज भाजपचा विश्वकर्मा योजनेसाठी कारागीरांचा मेळावा
मानवत / प्रतिनिधी.
तालूक्यातील ग्रामिण व शहरी पारंपरिक कारागिरांच्या मदतीसाठी असलेल्या प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या माहितीसाठी आज शनिवारी (दि.२३) सकाळी ११ वाजता या मेळाव्याचे योजन शहर संयोजक तथा भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेश चिटणीस प्राचार्य. अनंत गोलाईत यांच्या ःमार्गदर्शनाखाले मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
सविस्तर वृत्त असे की, देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांनी सबका साथ सबका विकास हा नारा दिला होता. त्या अनूसंगाने आज मानवत शहरातील माहेश्वरी भवनाच्या सभागृहा मध्ये कारागीरांचा मेळावा आयोजित करण्यात आला असून या मेळाव्याचे उद्घाटन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते करण्यात येणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजप जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे तर प्रमुख पाहुणे म्हणून भाजप मराठवाडा संघटन मंत्री संजय कौडगे, मराठवाडा विश्वकर्मा संयोजक दिग्विजय काथवटे, परभणी लोकसभा समन्वयक डॉ. सुभाष कदम, पाथरी विधानसभा मतदार संघाचे विकास पूरूष माजी आ. मोहन फड, उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी, मानवत तहसिलचे कर्तव्यदक्ष तहसीलदार रंजितसिंह कोळेकर, मानवत नगर परिषदेच्या मुख्याधिकारी श्रीमती कोमल सावरे, विलास बाबर, भाजपाचे मानवत तालुकाध्यक्ष विकास मगर, दादासाहेब भोरकडे, श्रीकांत माकुडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्यास जास्तीत जास्त कारागीरांनी या मेळाव्यास उपस्थीत राहावे असे आवाहन प्राचार्य अनंत गोलाईत यांनी केले आहे.
***