https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

ईरळद जिल्हा परिषद शाळेत *श्रीनिवास रामानुजन यांची जयंती राष्ट्रीय गणित दिन* म्हणून साजरी

मानवत / प्रतिनिधी.

मानवत तालुक्यातील मौ. ईरळद येथील जिल्हा परिषद शाळेत दिनांक २२ डिसेंबर रोजी श्रीनिवास रामानुजन यांची जयंती राष्ट्रीय गणित दिन म्हणून साजरी करण्यात आली.
यावेळी शाळेत गणित जत्रेचे आयोजन करण्यात आले होते.
श्रीनिवास रामानुजन हे भारतीय गणित तज्ञ होते त्यांची जयंती गणित दिवस म्हणून साजरी केली जाते यांच अनुषंगाने ईरळद जिल्हा परिषद शाळेत साजरी करण्यात आली यावेळी या कार्यक्रमाचा अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्यध्यापक श्री. दिगंबर भिसे हे होते दरम्यान शाळेत गणित जत्रेचे सुंदर असे नियोजन श्रीमती छाया पाटील यांनी केले होते तर कार्यक्रमात श्री. कैलास मोहकरे यांनी श्रीरामानूजन यांच्या जीवनावरील व त्यांनी मांडलेल्या विविध गणितीय सिद्धांता बद्दल आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. सुरेश कापसे यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी तेसाठी श्री. अशोक शिंदे यांच्या सह ईरळद जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी प्रयत्न केले. कार्यक्रमास विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

**

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704