https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

तमाम हिंदूच्या भावना लक्षात घेता कत्तलखाने बंद ठेवा:शिवाजीराव बोचरे पाटील

भाजपाची जिल्हा प्रशासनाकडे मागणी

मानवत / प्रतिनिधी.

श्रीराम जन्मभुमी आयोध्या येथे प्रभु, भगवान, श्रीरामचंद्राचे भव्य दिव्य मंदिराची प्राण प्रतिष्ठा होणार आहे त्या मुळे दिनांक २२/०१/२०२४ रोजी परभणी जिल्हयातील सर्व कत्तलखाने, मांसा विक्री केंद्र व दारु विक्री केंद्र बंद ठेवण्यात यावीत अशा मागणीचे निवेदन भाजपाचे परभणी जिल्हा उपाध्यक्ष शिवाजीराव बोचरे पाटील यांनी शिष्टमंडळासह जिल्हाधिकारी यांना भेटून केली आहे .
सविस्तर वृत्त असे की,
देशात २२ जानेवारी रोजी हिंदू बांधव दिपावली साजरी करणार असून याच दिवशी आयोध्येत प्रभूरामचंद्र यांच्या मंदीराची प्राणप्रतिष्ठा होणार आहे
वरील विषयाच्या अनुषंगाने हिंदु धर्माचे रघुवंशी राजा प्रभु श्रीरामचंद्राचे जन्म स्थान असलेल्या आयोध्या या पावन भुमीत प्रभु श्रीरामचंद्राचे भव्य दिव्य मंदिराची प्राण प्रतिष्ठा दिनांक २२/०१/२०२४ रोजी करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यात भाजपा, व हिंदू बांधवांच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहेत.
त्यामुळे तमाम श्रीराम भक्तांच्या भावना लक्षात घेता दिनांक २२/०१/२०२४ रोजी जिल्ह्यातील सर्व कत्तलखाने, मांसाहार विक्रीचे केंद्र व देशी दारु दुकाने बंद ठेवण्यात यावेत अशी मागणी भाजपाच्या वतीने भाजपाचे जिल्हाउपाध्यक्ष शिवाजी बोचरे पाटील.भाजपा यूवा मोर्चाचे प्रदेश सचिव नागसेनजी पूंडगे, भाजपा जिल्हाउपाध्यक्ष ॠषिकेश सकनूर , शिवेंद्र सालमोटे , दशरथराव कदम , गणेशराव यादव यांनी जिल्हा प्रशासनाला दिलेल्या एका निवेदनाद्बारे केली आहे.

**

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704