ताज्या घडामोडी
अॅड, सुनिल जाधव यांची राष्ट्रवादी काॅग्रेस लिगल सेलच्या जिल्हाध्यक्षपदी निवड
निवडीचे मानवत वकिल संघाकडून अभिनंदन

मानवत / प्रतिनिधी.
मानवत येथील प्रसिध्द विधितज्ञ अॅड, सुनिल जाधव यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (लिगल सेल) च्या परभणी जिल्हा अध्यक्षपदी दिनांक 01/01/2024 पासून नियुक्ती पक्षाच्या वतीने करण्यात आली असून राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष बळकटीसाठी व मजबुत करण्यासाठी तसेच पक्षाची ध्येय धोरणे व आदरणीय श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांचे विचार परभणी जिल्हयातील सर्व वकील बंधु व भगिनी तसेच सर्व सामान्य जनते पर्यंत पोहचविण्यासाठी आपले सहकार्य राहील असा मला विश्वास आहे.
निवडी बद्दल प्रदेशाध्यक्ष आशिष पंजाबराव देशमूख यांनी अभिनंदन केले आहे.
तर आज मानवत येथे वकिल संघाच्या वतीने अॅड बळीरामजी शिंदे, अॅड, यशपाल पंडित, अॅड श्याम कूर्हाडे अॅड, संजयकूमार हाजारे यांनी वकील संघाच्या सभागृहात अॅड, सुनिल जाधव यांचा सत्कार करून पूढील कार्यास शूभेच्छा दिल्या.
**