https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

यशवंत ‘ मध्ये त्वचा आरोग्यविषयक व्याख्यान संपन्न

नांदेड:( दि.१८ जानेवारी २०२४)
श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयात प्राणिशास्त्र विभाग, वैद्यकीय सहायता कक्ष व महिला सुरक्षा व सुधार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने व दिव्य स्पर्श स्कीन, हेअर व लेझर क्लिनिक यांच्या सौजन्याने ‘दैनंदिन जीवनात घ्यावी लागणारी त्वचेची काळजी’ या विषयावर त्वचा आरोग्यविषयक व्याख्यान संपन्न झाले.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू तथा विद्यमान प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन. शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार संपन्न झालेल्या या व्याख्यानाच्या प्रमुख वक्त्या त्वचा विकार तज्ञ डॉअश्विनी जायभाये (नागरगोजे) या होत्या.
याप्रसंगी प्रमुख उपस्थिती प्राणिशास्त्र विभागप्रमुख डॉ.संजय ननवरे, डॉ.धनराज भुरे, डॉ.मंगल कदम, डॉ. नीताराणी जयस्वाल, डॉ.एच.एल.तमलुरकर, डॉ.तोटावार, प्रा.नारायण गव्हाणे, प्रा.माने, डॉ.अंजली जाधव, डॉ.राजकुमार सोनवणे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी प्रास्ताविक करताना डॉ.संजय ननवरे यांनी, व्याख्यान आयोजनामागील भूमिका विशद केली तसेच महाविद्यालयातील विविध उपक्रमांची माहिती दिली.
प्रमुख वक्त्या डॉ.अश्विनी जायभाये (नागरगोजे) यांनी, दैनंदिन जीवनात सुंदर व नितळ त्वचेसाठी संतुलित आहार,पुरेसे पाण्याचे सेवन, आवश्यक तेवढी निद्रा, यथायोग्य व्यायाम करण्याची आवश्यकता स्पष्ट केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. धनराज भुरे यांनी केले तर प्रमुख वक्त्यांचा परिचय डॉ.नीताराणी जयस्वाल यांनी करून दिला शेवटी आभार डॉ. मंगल कदम यांनी मानले.
व्याख्यानाच्या यशस्वीतेसाठी डॉ.वीरभद्र स्वामी, डॉ.शिवराज शिरसाठ, डॉ.एस.एम.दुर्राणी, डॉ.अर्चना गिरडे, सौ. मनीषा बाचोटीकर यांनी परिश्रम केले, तसेच उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे तथा डॉ.हरिश्चंद्र पतंगे,अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या समन्वयिका डॉ.एल.व्ही. पदमाराणी राव, कार्यालयीन प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, डॉ.अजय गव्हाणे आदींनी सहकार्य केले.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704