यशवंत ‘ मध्ये तिरंगा रॅली उत्साहात संपन्न

नांदेड :(दि.१६ ऑगस्ट २०२५)
यशवंत महाविद्यालयात माजी प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार राष्ट्रीय सेवा योजना कक्षाच्या वतीने तिरंगा रॅली व स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले होते.
उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे यांनी हिरवा झेंडा दाखवून रॅलीची सुरुवात केली.
या रॅलीसाठी विद्यार्थ्यांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. रॅलीचा मार्ग महाविद्यालयाच्या प्रांगणातून डॉ.शंकरराव चव्हाण मेमोरियल तसेच आयटीएम कॉलेज येथून परत यशवंत महाविद्यालय असा होता. रॅलीमध्ये स्वच्छताविषयक व व्यसनधीनता विरोधी घोषवाक्य देण्यात आले होते.
रॅलीस उपप्राचार्य डॉ.हरिश्चंद्र पतंगे, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.कबीर रबडे आणि पर्यवेक्षिका प्रा.वंदना बदने यांचे मार्गदर्शन लाभले.
रॅलीच्या यशस्वीतेकरिता राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ.कैलास इंगोले, डॉ.राजरत्न सोनटक्के, प्रा.राजश्री भोपाळे, प्रा.अभिनंदन इंगोले, प्रा.श्रीराम हुलसुरे व राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले तसेच डॉ. अजय गव्हाणे,प्रबंधक संदीप पाटील अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, जगन्नाथ महामुने आदींनी सहकार्य केले.