डॉ.शंकररावजी चव्हाण यांचे चरित्र म्हणजे महाराष्ट्राच्या पाटबंधारे खात्याचा विकास -डॉ.सुरेश सावंत

नांदेड: दि.१५ जुलै २०२५)
यशवंत महाविद्यालयातील ‘यशवंत प्रबोधन व्याख्यानमाला’ समितीच्या वतीने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि देशाचे माजी गृहमंत्री श्रद्धेय कै.डॉ. शंकररावजी चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त माजी प्र -कुलगुरु प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन. शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार दि. १४ जुलै रोजी विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले.
याप्रसंगी प्रमुख वक्ते साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ साहित्यिक आणि अभ्यासक डॉ. सुरेश सावंत यांना आमंत्रित करण्यात आले होते.
‘ श्रद्धेय डॉ. शंकरराव चव्हाण यांचे जीवन व कार्य’ या विषयावर बोलताना डॉ. सुरेश सावंत यांनी, सामाजिक, राजकीय आणि प्रशासकीय योगदान अत्यंत सुस्पष्ट आणि अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडले.
डॉ. शंकररावजी चव्हाण यांचे चरित्र म्हणजे महाराष्ट्राच्या पाटबंधारे खात्याचा विकास होय, असे विचार व्यक्त केले. डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील काळात मराठवाड्यातील पाटबंधारे प्रकल्पांना मिळालेल्या चालना, ग्रामीण भागाच्या विकासासाठी त्यांनी घेतलेले पुढाकार, शिक्षण आणि उद्योगक्षेत्रात त्यांनी उभारलेली मूलभूत पायाभूत कामगिरी यावर सविस्तर प्रकाश टाकला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ. कविता सोनकांबळे होत्या. त्यांनी अध्यक्षीय समारोपात, डॉ.शंकरराव चव्हाण यांचे शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील कार्य नव्या पिढीसमोर नेण्याचे महत्त्व अधोरेखित केले.
उपप्राचार्य डॉ.हरिश्चंद्र पतंगे तथा प्रा.कबीर रबडे, पर्यवेक्षिका प्रा. वंदना बदने आणि व्याख्यानमाला समितीचे समन्वयक डॉ. संदीप पाईकराव मंचावर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. संदीप पाईकराव यांनी केले तर शेवटी आभार डॉ. साईनाथ शाहू यांनी मानले.
याप्रसंगी समिती सदस्य डॉ. गौतम दुथडे, डॉ.मीरा फड, डॉ.ज्ञानेश्वर पुपलवाड, ग्रंथपाल डॉ. कैलास वडजे, डॉ. राजरत्न सोनटक्के, प्रा. एस.एस.मावसकर, प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील तसेच प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रसिद्धी समन्वयक डॉ.अजय गव्हाणे यांनी सहकार्य केले.