यशवंत ‘ मध्ये जागतिक कागदी पिशवी दिवस उत्साहात संपन्न

नांदेड:( दि. १२ जुलै २०२५)
श्री.शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयात माजी प्र- कुलगुरू प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन. शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार राष्ट्रीय छात्र सेनेच्या वतीने राष्ट्रीय कागदी पिशवी दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
याप्रसंगी प्रमुख अतिथी डॉ. कांचन जी. गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना, मानवी जीवनात कागदी पिशवीचे किती महत्त्व आहे व पॉलिथिन बॅग मानवी शरीरास व मुक्या प्राण्यास किती हानिकारक आहे, याबद्दल सविस्तर माहिती दिली. वर्षानुवर्ष नष्ट न होणाऱ्या पॉलिथिन बॅगमुळे पावसाळ्यात तुंबलेल्या पाण्यामुळे होणाऱ्या हानीचे वर्णन केले. या पॉलिथिन बॅग खाल्ल्यामुळे मुक्या जनावरांच्या होणाऱ्या मृत्यूचीही कल्पना दिली व उपस्थितांना व विद्यार्थ्यांना आयुष्यात कधीही पॉलिथिन बॅग न वापरण्याचा संकल्प करण्याचे आवाहन केले तसेच इतरांनाही पॉलिथिन बॅग वापरण्यापासून परावृत्त करण्याचे सुचित केले. घराबाहेर निघताना कागदी पिशवी सोबत घेऊन निघण्याची सवय लावावी. दुकानदारांनी, ठेलेवाल्यांनी, विविध वस्तू दुकानात व रस्त्यावर विकणाऱ्या गाडीवाल्यांनी देखील ग्राहकांना पॉलिथिन बॅग न देता कागदी पिशवी द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान उपप्राचार्य के.आर.रबडे यांनी भूषविले. कार्यक्रमाचे आयोजन एन.सी.सी.चे लेफ्टनंट प्रा.श्रीकांत सोमठाणकर यांनी केले.
प्रारंभिक प्रास्ताविक प्रा. ओमप्रकाश गुंजकर यांनी केले. याप्रसंगी प्रा.नरेंद्र कंचटवार, प्रा.आर.जे.जमदाडे, प्रा. सचिन महिंद्रकर आणि एनसीसी कॅडेट्सची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
शेवटी आभार प्रा. प्रियंका सिसोदिया यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे तथा डॉ.हरिश्चंद्र पतंगे, पर्यवेक्षिका प्रा. वंदना बदने, माजी लेफ्टनंट डॉ. रामराज गावंडे, डॉ.अजय गव्हाणे, प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील यांनी सहकार्य केले.