ताज्या घडामोडी
I Love You म्हणणे लैंगिक छळ नव्हे’ हायकोर्टाने दिला महत्वाचा निर्णय….

”
मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने एका पॉक्सो अंतर्गत असलेल्या प्रकरणात एक महत्वाचा निर्णय दिला आहे.. या प्रकरणातील तरुणाची मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने निर्दोष मुक्तता केली आहे, केवळ आय लव्ह यू म्हटल्याने लैंगिक छळ होऊ शकत नाही असे नागपूर खंडपीठाने स्पष्ट केले आहे. लैंगिक छळाचा हेतू सिद्ध होणे आवश्यक आहे, असे हायकोर्टाने स्पष्ट केले
आहे. त्यामुळे आता पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झालेल्या तरुणाची सुटका झाली आहे. आय लव्ह यु म्हणणे हें केवळ भावना व्यक्त करणे आहे. तो लैंगिक छळ होत नाही, असे हायकोर्टाने म्हटले आहे, या प्रकरणातील तरुणाची शिक्षा हायकोर्टाने रद्द केली आहे. त्यामुळे केवळ आय लव्ह यु म्हणणे हा लैंगिक छळ होऊ शकत नाही असे महत्वाचे निरीक्षण मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने नोंदवले आहे.