नेसुबो महाविद्यालयातील एनसीसी कॅडेट भारतीय सैन्य दलात दाखल

नांदेड:
भारतीय लष्करात अत्यंत सन्मानदायक प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या जीडी पदावर नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयाच्या एन.सी.सी. कॅडेट् राहुल गायकवाड व चंद्रकांत गायकवाड भारतीय सैन्य दलात दाखल झाले आहेत. या कॅडेट्सला एन.सी.सी विभाग प्रमुख लेफ्टनंट डॉ. किशोर इंगळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
दाखल झालेल्या कॅडेट्चा बुधवार दिनांक ११ जून रोजी अभिनव भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय बालासाहेब पांडे, कोषाध्यक्ष कैलासचंदजी काला, सचिवा ॲड. सौ.वनिताताई जोशी, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रोफेसर डॉ. महेंद्रकुमार कुलकर्णी या सर्व मान्यवरांच्या हस्ते दाखल झालेल्या कॅडेट्सचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी अभिनव भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. बालासाहेब पांडे यांनी सैन्य दलात भरती झालेल्या सर्व कॅडेटसचे कौतुक करून पुढील भविष्यासाठी शुभेच्छा देताना म्हणाले की महाविद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सेनेचे कॅडेट्स हे दरवर्षी सातत्याने भारतीय सैन्य दलात दाखल होत आहेत व देश सेवेसाठी त्यांचे योगदान अमूल्य आहे याचा आम्हा सर्वांना सार्थ अभिमान आहे. तसेच एन.सी.सी विभागाच्या भरीव यशाबद्दल अभिनंदन केले.सदरील सत्काराच्या कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन महाविद्यालयाचे संख्याशास्त्र विभाग प्रमुख तथा एन.सी.सी. अधिकारी लेफ्टनंट डॉ. किशोर इंगळे यांनी केले.
या कार्यक्रमाप्रसंगी पदार्थविज्ञान शास्त्र विभाग प्रमुख डॉ मनीष देशपांडे, सायन्स महाविद्यालयाचे माजी उपप्राचार्य डॉ. डी डी पवार, डॉ.पंकज यादव, तसेच संस्थेचे कर्मचारी श्री भुजंगराव करडखेडकर यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच महाविद्यालयातील इतर प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांनी निवड झालेल्या सर्व छात्र सैनिकांचे अभिनंदन केले..