ताज्या घडामोडी

श्री गुरुगोविंद सिंघजी महाविद्यालयाचा विद्यार्थी सुशांत ठमके* *हिंदी चित्रपटाचा ‘नायक’ पत्रकारिता शिक्षणातही ‘सुपरस्टार

बी. ए. (एम. सी. जे.) पत्रकारिता अभ्यासक्रमात महाविद्यालयातून सर्वप्रथम

नांदेड, (प्रतिनिधी)- येथील श्री गुरुगोविंद सिंघजी पत्रकारिता महाविद्यालयाच्या बी. ए. एम. सी. जे. पत्रकारिता पदवी अभ्यासक्रमाचा अंतिम वर्षाचा विद्यार्थी सुशांत प्रशांत ठमके हा ७०.८८ टक्के गुण घेऊन उच्चश्रेणीत महाविद्यालयातून सर्वप्रथम ठरला आहे. विविध कलागुणांनी निपुण असलेला शुशांत ठमके यांनी क्रीडा, कला क्षेत्राबरोबरच पत्रकारिता शिक्षणाच्या अभ्यासक्रमातही आपण अग्रेसर असल्याचे या निकालावरून दाखवून दिले आहे. सुशांत ठमके हा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठांतर्गत झालेल्या तायक्वांदो स्पर्धेतही यशाच्या शिखरावर पोहोचला. जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर त्याने या क्रीडा प्रकारामध्ये पुरस्कार प्राप्त केले. श्री गुरुनानाकदेव विद्यापीठ अमृतसर येथे झालेल्या अखिल भारतीय यूनिवर्सिटी स्पर्धेत शुशांत ठमके याला तायक्वांदो या क्रीडा प्रकारात सिल्वर मेडल मिळाले.

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या इतिहासात पहिल्यांदा हे पहिल्यांदाच घडले आहे. एवढ्यावरच न थांबता सुशांत ठमके यांनी अलीकडेच बॉलीवूडमध्ये प्रवेश करून ‘पिंटू की पप्पी’ या हिंदी चित्रपटामध्ये प्रमुख नायकाची भूमिका साकारली आहे. चित्रपट क्षेत्रात काम करताना सुद्धा त्याने पत्रकारिता अर्थात मास कम्युनिकेशन अँड जर्नालिझम शिक्षणालाही प्राधान्य दिले. पत्रकारिता पदवी अभ्यासक्रमात त्याने उच्चतम श्रेणी प्राप्त केली. किनवट येथील शैक्षणिक क्षेत्रातले अग्रणी तसेच सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे इंजिनिअर प्रशांत ठमके यांचा सुशांत हा सुपुत्र आहे. श्री गुरुगोविंद सिंघजी पत्रकारिता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विकास कदम, प्रा. सुरेश पाटील, प्रा. डॉ. शुद्धोधन एडके, प्रा. अमोल धुळे, प्रा. संजय नरवाडे, प्रा. विपिन कदम प्रा. शारदा कुलकर्णी शिक्षकेतर कर्मचारी अनिल विनायते, भारत सोनटक्के आदींनी या यशाबद्दल सुशांत ठमके याचे कौतुक केले आहे.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.