यशवंत ‘ मध्ये पदवी वितरण समारंभ थाटात संपन्न*

*’
नांदेड :(दि.२२ एप्रिल २०२५)
श्री. शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ परीक्षा:२०२४ मध्ये घवघवीत यश संपादन करणाऱ्या बी.ए., बी.कॉम., बी.एससी., एम.ए., एम.कॉम., एम.एससी. शाखेसह अन्य शाखेतील विद्यार्थ्यांना पदवी वितरण करून सन्मानित करण्यात आले.
पदवी वितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सहसचिव माजी प्राचार्य डॉ.रावसाहेब शेंदारकर होते तर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे उपकुलसचिव डॉ.रवी सरोदे यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थ्यांना पदवी वितरण करण्यात आले.
यावेळी विचारपिठावर माजी प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन. शिंदे, स्वामी विवेकानंद महाविद्यालय, शिरूर ताजबंद येथील समाजशास्त्र विभागप्रमुख व विद्यापीठ विद्या परिषद सदस्य डॉ. नारायण कांबळे, उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे, डॉ.हरिश्चंद्र पतंगे, परीक्षा केंद्रप्रमुख डॉ. शिवराज बोकडे, डॉ.संदीप पाईकराव यांची उपस्थिती होती.
प्रारंभी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले.
प्रास्ताविकात प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन.शिंदे म्हणाले की, चिकाटी, संयम, जिद्द या त्रिसूत्रीचा अवलंब विद्यार्थ्यांनी केल्यास यश संपादन करणे सोपे होते. विद्यार्थ्यांना अधिकाधिक वाचन करण्याचा सल्ला त्यांनी यावेळी दिला.
परीक्षा केंद्रप्रमुख डॉ. शिवराज बोकडे यांनी पदवी वितरण समारंभ अहवालाचे वाचन केले.
उपकुलसचिव डॉ. रवी सरोदे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना, विद्यार्थ्यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवला पाहिजे व यश मिळाल्यानंतर आपल्या आई-वडिलांच्या उपकाराची नेहमी जाणीव ठेवली पाहिजे, असे मत मांडून आई-वडिलांची सेवा ही अत्यंत महत्त्वाची असते, असे विचार मांडले.
विद्यापीठ विद्या परिषद सदस्य डॉ.नारायण कांबळे यांनी, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार विद्यार्थ्यांच्या जीवनात स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता, मानवता आणि यशस्वीता प्राप्त करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन केले. यशवंत महाविद्यालयामध्ये पदवी वितरण समारंभ थाटात संपन्न होत असल्याबद्दल भरभरून कौतुक केले.
अध्यक्षीय समारोपात संस्थेचे सहसचिव माजी प्राचार्य डॉ.रावसाहेब शेंदारकर यांनी, विद्यार्थ्यांनी समाज हितासाठी सदैव प्रयत्नरत रहावे आणि आशावादी दृष्टिकोन ठेवून सकारात्मक कार्य करत रहावे, अशी अपेक्षा व्यक्त करून पदवी प्राप्त विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.
सूत्रसंचालन डॉ.शिवाजी सूर्यवंशी यांनी केले तर आभार प्रा. भारती सुवर्णकार यांनी मानले.
सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी परीक्षा सहाय्यक केंद्रप्रमुख डॉ.विजय भोसले, डॉ.शिवदास शिंदे, डॉ.संगीता शिंदे (ढेंगळे), प्रा. संगीता चाटी, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या समन्वयिका डॉ.एल.व्ही. पदमारानी राव, सहसमन्वयक डॉ.एस.एल. शिंदे, डॉ.अजय गव्हाणे, प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, बालाजी देशमुख, साई मोरे, जगन्नाथ महामुने, परशुराम जाधव, माणिक कल्याणकर आदींनी सहकार्य केले.