जय भारत माता सेवा समितीचा महू येथे भीमजयंती सोहळा

नांदेड- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंती निमित्त कर्नाटक मधून रॅली काढून 14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जन्मस्थळ असलेल्या मध्यप्रदेशातील महू येथे भव्य दिव्य भीम जयंती सोहळा आयोजीत करण्यात आला असल्याची माहिती जय भारत माता सेवा समितीचे राष्ट्रीय सदस्य सिद्धार्थ तलवारे यांनी दिली आहे. याच सोहळ्यात मान्यवर व्यक्तींना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
जय भारत माता सेवा समितीचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. हवा मल्लिनाथ महाराज यांच्या दिव्य नेतृत्वात जय भारत माता मंदिर लाड चिंचोली तांडा येथून भव्य रॅली काढण्यात येणार आहे. ही रॅली चेकपोस्ट आळंद, अक्कलकोट, सोलापूर, भिगवण, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, धुळे आदी जिल्ह्यांचा प्रवास करुन मध्यप्रदेशातील महू येथे बाबासाहेबांच्या जन्मस्थळी पोहचणार आहे. 14 एप्रिल रोजी महू येथील चौपडा वाटिका येथे जयंती सोहळा थाटात साजरा होणार आहे. या सोहळ्यात श्री हवा मल्लिनाथ महाराज सेवाभावी संस्था बिलोली यांच्या वतीने नामांकित व्यक्तींना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. महू येथील जयंती सोहळ्यासाठी जय्यत तयारी सुरू असून ज्यांना महाराष्ट्रातून निघणार्या रॅलीत सहभागी व्हायचे असल्यास त्यांनी संपर्क करण्याचे आवाहन जय भारत माता सेवा समितीचे राष्ट्रीय सदस्य सिद्धार्थ तलवारे () यांनी केले आहे.
ःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःः