ताज्या घडामोडी
कौशल्याबाई कदम यांचे वृद्धापकाळाने निधन
सेवानिवृत्त प्राचार्य डी.पी. कदम यांना मातृषोक

नांदेड, (प्रतिनिधी)-येथील सहयोग नगर भागातील ज्येष्ठ नागरिक कौशल्याबाई पांडुरंग कदम यांचे आज दुपारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ८५ वर्षाच्या होत्या. दिवंगत कौशल्याबाई पांडुरंग कदम यांच्या पार्थिवावर उद्या सकाळी १० वाजता नांदेड येथे गोवर्धन घाट स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी, सून नातवंडे असा मोठा परिवार आहे. सेवानिवृत्त प्राचार्य डी.पी. कदम यांच्या त्या मातोश्री होत.