स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेत रोटरी क्लबच्या वतीने मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन

–
उदगीर :- येथील स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ उदगीर या शिक्षण संस्थेत संस्थापक अध्यक्ष तथा प्राचार्य डॉ. सुधीर जगताप व रोटरी क्लब उदगीर यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थी साठी मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या प्रशासकीय अधिकारी ज्योती स्वामी तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून विशाल जैन उपस्थित होते. यावेळी मंचावर रोटरी क्लबच्या अध्यक्षा सरस्वती चौधरी, पत्रकार रवी हसरगुंडे, सुयश बिरादार, डॉ. सुधीर जाधव, प्राचार्य डॉ. गणेश तोलसरवाड, डॉ. शेषनारायण जाधव, ज्योती चौधरी, मनोरमा शास्त्री यांची प्रमुख उपस्थिती होती.
सदरील कार्यक्रमात मार्गदर्शन करताना विशाल जैन म्हणाले की, रोटरी क्लब चा इतिहास फार जुना आहे. जगातील सर्वच देशात आज रोटरी क्लब कार्य करीत आहे. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, महिला सबलीकरण हे विषय घेऊन रोटरी क्लब सतत कार्य करीत आहे. येणाऱ्या काळात रोटरी क्लब महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना या विषयात कार्य करण्याची संधी उपलब्ध करून देणार आहे त्याकरिता सर्वत्र रोटरी युथ क्लब ची स्थापना करण्यात आली असून यात अधिकाधिक विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे असे ही ते म्हणाले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्योती स्वामी यांनी तर सूत्रसंचालन प्रा. अमर तांदळे व आभार प्रा. राहुल पुंडगे यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. राशिद दाईमी, प्रा. नम्रता कुलकर्णी, प्रा. शेख आवेज, प्रा. रोहिणी रोडगे, प्रा. रोहिणी वाघमारे, प्रा. अनुजा चव्हाण, प्रा. वैष्णवी गुंडरे, प्रा. आसिफ दाईमी, अमोल भाटकुळे, अपर्णा काळे, सविता वाघमारे, यांनी परिश्रम घेतले.