स्वा. रा. ती. म. विद्यापीठातील माध्यमशास्त्र संकुलात *’रंग चेहऱ्यांचे’ – छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन

नांदेड: स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या माध्यमशास्त्र संकुलातील विद्यार्थ्यांनी टिपलेल्या पोर्ट्ट्रेटचे ‘रंग चेहऱ्यांचे’ छायाचित्र प्रदर्शन आयोजन करण्यात आले आहे. माध्यमशास्त्र संकुलात
या प्रदर्शनाचे उद्घाटन गुरुवार दि., १३ मार्च २०२५ रोजी सकाळी ११. ३० वाजता होणार आहे. विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. डी.डी. पवार यांच्या हस्ते गुरुवार दि. १३ मार्च २५ रोजी सकाळी ११. ३० वाजता या प्रदर्शनाचे उदघाटन होणार आहे. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून आंतर विद्याशाखीय अभ्यास विद्याशाखेचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत बाविस्कर उपस्थित राहणार आहेत.
या छायाचित्र प्रदर्शनामध्ये मानवी जीवनातील विविध पैलू, सामाजिक परिस्थिती, सौंदर्य आणि सांस्कृतिक विविधतेचे दर्शन घडणार आहे. प्रत्येक चेहरा आपली स्वतःची कहाणी सांगत असतो. ती कहाणी टिपणं ही कला आहे. प्रदर्शनातील चित्रांमध्ये भावभावना आणि कलात्मकता यांचे सुंदर मिश्रण पाहायला मिळणार आहे. विद्यार्थ्यांनी आपली सर्जनशीलता आणि तांत्रिक कौशल्ये दाखवून विविध छायाचित्रे सादर केली आहेत. हे प्रदर्शन दि. १३ ते १७ मार्च २५ सकाळी १०. ३० ते सायं ५. ३० या कालावधीत सर्वांसाठी खुले राहील.
तरी अधिकाधिक विद्यार्थी व छायाचित्र प्रेमींनी या प्रदर्शना लाभ घ्यावा, असे आवाहन माध्यमशास्त्र संकुलाचे डॉ. राजेंद्र गोणारकर, छायाचित्र प्रदर्शनाचे समन्वयक डॉ. सचिन नरंगले, डॉ. दीपक शिंदे, डॉ. सुहास पाठक, डॉ. कैलाश यादव, प्रा.गिरीश जोंधळे यांनी केले आहे.