ताज्या घडामोडी

नेसुबो महाविद्यालयामध्ये सूक्ष्मजीवशास्त्र विभागतर्फे एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन

नांदेड: (डॉ प्रवीणकुमार सेलूकर)

दिनांक 10 मार्च 2025 रोजी अभिनव भारत शिक्षण संस्था नांदेड संचलित नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयातील आणि मुक्ताई प्रतिष्ठान देगलूर संचलित वै. धुंडा महाराज देगलूरकर महाविद्यालयातील सूक्ष्मजीवशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने “टेक्निक्स इन मायक्रोबियल जेनेटिक्स” या एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन केले होते. कार्यशाळेत दोन्ही महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग होता. या कार्यशाळेमध्ये विद्यार्थ्यांना डीएनए आणि आरएनए मात्रा तपासणी तसेच अतिनील किरणांचा सूक्ष्मजीवांच्या वाढीवर व जनुकांवर होणारा परिणाम आणि त्यांची दुरुस्ती यंत्रणा अशा सूक्ष्मजीवांच्या जनुकांशी संबंधित प्रात्यक्षिकाचे प्रशिक्षण देण्यात आले. विद्यार्थ्यांनी या प्रशिक्षणादरम्यान विविध प्रश्न विचारून आपल्या शंका दूर केल्या. या कार्यशाळेच्या उदघाटनात धुंडा महाराज देगलूरकर महाविद्यालयाचे सूक्ष्मजीवशास्त्रविभाग प्रमुख व संसाधन व्यक्ती डॉ. आनंद आतनूरकर यांनी विद्यार्थांना सूक्ष्मजीवांच्या जनुकविषयी आणि विविध भौतिक रासायनिक तसेच जैवीक उत्परिवर्तकांचा जनुकाच्या संरचनेत किंवा त्याच्या क्रमात बदल कसा होतो या विषयी सखोल माहिती दिली. त्यानंतर नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयातील सूक्ष्मजीवशास्त्रविभाग प्रमुख डॉ. सागर साकळे यांनी सूक्ष्मजीवांच्या जनुकांच्या संरचनेत उत्परिवर्तकांचा साह्याने बदल घडवून सुधारित सूक्ष्मजीवांचा वापर आद्योगिक उत्पादनातवृद्धी यामध्ये संशोधन व करियरच्या संधी यासंदर्भात विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या समारोपात प्राचार्य डॉ. एम.वाय. कुलकर्णी यांनी नवीन शैक्षणिक धोरणात नमूद असलेले समंजस्य करारातून विद्यार्थ्यांच्या हितासाठी अश्याप्रकारचे उपक्रम भविष्यातही आयोजित करण्याचे प्रतिपादन केले. धुंडा महाराज महाविद्यालयातील पदवीची कु. आरती वडजे, नेसूबो महाविद्यालयाचे पीएचडी विद्यार्थी मो. उरूस व पद्दूत्तर ची कु. निकिता कानोळे ह्यानी आपल्या मनोगतमध्ये कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांना होणारे विविध फायदे व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पद्दूतर विद्यार्थीनी कु. वैशाली मोरे व आभार प्रदर्शन कु. सुप्रिया आरटवार यांनी केले. तसेच सीएचबी प्रा. पियुषा कुलकर्णी, प्रा. रागिणी अग्रवाल व प्रयोगशाळा तंत्रज्ञा अनिता होसूर यांनचेही मोलाचे सहकार्य लाभले. या कार्यशाळेचे आयोजन यशस्वीरित्या पार पडल्याबद्दल अभिनव भारत शिक्षण संस्था नांदेड चे अध्यक्ष श्री. बाळासाहेब पांडे व नेसूबो महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. वाय. कुलकर्णी तसेच मुक्ताई प्रतिष्ठान देगलूरचे सचिव श्री. राजेश महाराज देगलूरकर व धुंडा महाराज महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. पी. कुलकर्णी यांनी सूक्ष्मजीवशास्त्रविभाग प्रमुख डॉ. आनंद आतनूरकर आणि डॉ. सागर साकळे यांचे अभिनंदन केले. ही कार्यशाळा विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरली असून भविष्यात असेच वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणारे उपक्रम घेण्याचा संकल्प आयोजकांनी केला आहे.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.