ताज्या घडामोडी

सिडको कार्यालय येथे दलालांचा नंतर आता कर्मचारी कार्यालयीन कामात सरसावले…

नवीन नांदेड – गेल्या अनेक वर्षांपासून दलालांचा सहाय्याने सिडको कार्यालय येथे प्रलंबित कामे मोठया प्रमाणात खोळंबल्या नंतर शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा दक्षिण प्रमुख विनय पाटील गिरडे यांनी प्रशासक यांना घेराव घेतला नंतर काही दिवस दलाल मुक्त कार्यालय झाल्यानंतर आता खुद्द कर्मचारी रजिस्ट्री करणे यासह अनेक कामे पुन्हा एकदा होत आहेत, फक्त कार्यालय बंद बाकी चालू असल्याचे वृत्त असुन संबंधीत कर्मचारी यांच्या वर पायबंद घालावा अशी मागणी होत आहे.
सिडको नवीन नांदेड येथे गेल्या अनेक वर्षांपासून प्रभारी प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात होते या ठिकाणी नियुक्ती करण्यासाठी अनेक अधिकारी वजन खर्च करून येथे नियुक्ती होत असल्याची चर्चा असुन केवळ महिन्यात एक वेळ भेट देऊन कामकाज उरकण्यात येत असते पण गेल्या अनेक वर्षांपासून सिडको परिसरातील भुखंड धारक व घरधारक यांच्या सह अनेक कामे प्रलंबित होत होती तर अनेकांची कामे दलाल हे तीन चार वर्षांपासून प्रलंबित असल्याचा तक्रारी आल्या वरून मनपाचे माजी उपमहापौर विनय पाटील गिरडे तथा दक्षिण शिवसेना जिल्हाप्रमुख विनय पाटील गिरडे यानी सिडको प्रशासक गजानन सातोटे यांना धारेवर धरून प्रलंबित कामे का ,दलाल बंदी यासह अनेक प्रश्न उपस्थित केले, अखेर काही कामे तात्काळ झाली व दलालांना काही दिवस कार्यालय बंद पण बाहेर मोकाट , कर्मचारी अधिकारी संगनमताने कामे सोपस्कार होत होती.
मुख्य कार्यालय औरंगाबाद नावाखाली जणू कर्मचारी फाईल व संचिका घेऊन जात आहेत, यामुळे कार्यालय येथे कोणीही कर्मचारी उपलब्ध राहत नाहीत आहे ते कर्मचारी दलालांचा साह्याने रजिस्टरी कार्यालय व ईतर जात आहेत,दलाल मुक्त नंतर कर्मचाऱ्यांना प्रशासनाने आवर घालावा व नियोजीत कामे वेळेवर करावी अशी मागणी होत आहे

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.