स्वामी विवेकानंद कॅम्पस मध्ये मराठी भाषा गौरव दिन व राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा

—————————————-
उदगीर :- येथील स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वामी विवेकानंद महाविद्यालय, फार्मसी कॉलेज, नर्सिंग कॉलेज, जय हिंद पब्लिक स्कूल, स्वामी विवेकानंद अध्यापक महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा प्राचार्य डॉ. सुधीर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली मराठी राजभाषा दिवस ( कुसुमाग्रज जयंती ) व राष्ट्रीय विज्ञान दिवस (सी.वी रमण) यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी व्यापीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ. गणेश तोलसरवाड हे होते तर प्रमुख वक्ते म्हणून जय हिंद पब्लिक स्कूलचे परीक्षा विभाग प्रमुख प्रा.अजित जाधव व प्रमुख पाहुणे म्हणून स्वामी विवेकानंद महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. शेषनारायण जाधव, रासेयोचे कार्यक्रमाधिकारी प्रा.अमर तांदळे, पत्रकारिता व परीक्षा विभागाचे प्रमुख प्रा. राहुल पुंडगे, संगणकशास्त्र विभागाचे प्रभारी प्रा. राशिद दायमी यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला कुसुमाग्रज व सी.वी रमण यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रा. अजित जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, मराठी भाषा ही आपल्या अस्मितेची भाषा आहे. ही भाषा अधिक समृद्ध करण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहिले पाहिजे. आज माहिती व तंत्रज्ञानाच्या विकासामुळे मराठी भाषेत भेसळ निर्माण झाली आहे. आपण दैनंदिन व्यवहारात अस्सल मराठी भाषा बोलू शकत नाही हि शोकांतिका आहे. कारण इंग्रजी भाषेचा आपल्या व्यवहारात वापर वाढला आहे. कधी कधी मराठी भाषेतील शब्दाचा अर्थ मुलांना कळत नाही पण त्याचाच इंग्लिश मधील शब्द समजतो हे पण चित्र सर्वत्र आपणास पाहायला मिळते. त्यामूळे जास्त अधिक न करता किमान आपण दैनंदिन जीवनात बोलत असताना मराठी भाषेचा वापर करावा असे देखील ते म्हणाले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. नम्रता कुलकर्णी,तर आभार प्रा.राहुल पुंडगे यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी, प्रा. असिफ दायमी, प्रा. नावेद मणियार, प्रा. वैष्णवी गुंडरे,प्रा. रोहिणी वाघमारे, प्रा.वैष्णवी रोडगे,अमोल भाटकुळे, अपर्णा काळे, सविता वाघमारे यांनी परिश्रम घेतले.