माता अहिल्याबाई होळकर पुरस्कार रूचिरा बेटकर यांना जाहीर

नांदेड प्रतिनिधी:- दिनांक २७ जानेवारी २०२५ रोजी मुदखेड येथे सप्तरंगी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित सप्तरंगी साहित्य मंडळाचे चौथे जनसंवाद ग्रामीण साहित्य संमेलनात सौ. रूचिरा बेटकर यांना मातोश्री भागाबाई डोंगरे प्रतिष्ठान, उमरी यांच्या तर्फे माता अहिल्याबाई होळकर पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. त्यांच्या सातत्यपूर्ण संवेदनशी लेखनाची आणि साहित्यिक चळवळीतील योगदानाची दखल घेऊन हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार आहे. या संमेलनाचे उद्घाटन खा. अशोक चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे तर संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जगदीश कदम यांची निवड झालेली आहे. तसेच आ. श्रीजया चव्हाण, माजी आ. राम पाटील रातोळीकर, अभिनेत्री माधुरी लोकरे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. हे संमेलन प्रज्ञादर्शन शिक्षण संस्था मुदखेड व सप्तरंगी साहित्य मंडळ, महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील रणछोडदास मंगल कार्यालयात संपन्न होणार आहे.