प्राध्यापकांच्या प्रलंबित प्रश्नांवर ‘ स्वामुक्टा’ संघटनेचा सहसंचालकांशी बैठकीद्वारे संवाद

नांदेड :(डॉ.प्रवीणकुमार सेलूकर!)प्राध्यापकांच्या प्रलंबित प्रश्नांवर ‘ स्वामुक्टा’ संघटनेचा सहसंचालकांशी बैठकीद्वारे संवाद* स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड अंतर्गत अशासकीय महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करणेबाबत महाराष्ट्र प्राध्यापक महासंघ (एमफुकटो) संलग्नीत ‘स्वामुक्टा’ प्राध्यापक संघटनेच्या वतीने दि. 19.09.2024 रोजी मा. सहसंचालक यांना निवेदन सादर करून सदरील प्रश्नांच्या अनुषंगाने चर्चा करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्याची मागणी केली होती. त्यास अनुसरून मा. सहसंचालक यांनी दि. 20.01.2025 रोजी संघटनेला पत्र पाठवून दि. 23.01.2025 रोजी बैठकीसाठी सहसंचालक कार्यालय नांदेड येथे पाचारण केले होते त्यास अनुसरून सदरील बैठक संपन्न झाली. सदरील बैठकीत संघटनेच्या वतीने सहसंचालक कार्यालय यांचे स्तरावरील प्रलंबित विषय व मा. सहसंचालक यांनी शासन स्तरावर पाठपुरावा करण्याचे विषय अशी विभागणी करून प्रस्तुत निवेदनातील नमूद मागण्यांवर मुद्देनिहाय कागदपत्रे सादर करत मांडणी करण्यात आली. यावेळी बोलताना मा. सहसंचालक यांनी सर्व मुद्यांवर सविस्तर चर्चा केली व आपल्या कार्यालयाच्या स्तरावरील प्रश्नांची जलदगतीने सोडवणूक करण्यासाठी कालबद्ध उपाययोजना केल्या जातील असे सांगितले. तसेच शासन स्तरावरील प्रलंबित प्रश्नांवर धोरणात्मक निर्णय होणेसाठी सकारात्मक दृष्टिकोनातून पाठपुरावा केला जाईल असे संघटनेला आश्वस्त केले. याप्रसंगी शिष्टमंडळात संघटनेचे अध्यक्ष डॉ. सुर्यकांत जोगदंड, सचिव डॉ. विजय भोपाळे, कोषाध्यक्ष डॉ. दिलीप पाईकराव, उपाध्यक्ष डॉ.डी. एन. मोरे, केंद्रीय कार्यकारिणी सदस्य डॉ. करुणा देशमुख, डॉ. रामचंद्र भिसे, डॉ. किशोर हुगे, डॉ.अमोल लाटे, डॉ. सुनील व्यवहारे, डॉ.रामचंद्र भिसे, डॉ. काशिनाथ चव्हाण, डॉ.प्रताप देशमुख आदि मंडळी उपस्थितीत होती. (सोबत: निवेदन प्रत)