वाचनामुळे जगण्याची ओळख होते. -भारत दाढेल.

नवीन नांदेड.
वाचनामुळे संवेदना जागृत होतात, वाचनातून नैराश्य दुर होते, आणि आपल्याला जगण्यासाठी ओळख निर्माण होते असे प्रतिपादन साहित्यिक व पत्रकार भारत दाढेल यांनी केले.
श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचालित इंदिरा गांधी वरिष्ठ महाविद्यालय सिडको नांदेड येथे वाचन संकल्प महाराष्ट्राचा अंतर्गत “लेखक आपल्या भेटीला” या उपक्रमांतर्गत
ते पुढे म्हणाले की, लेखक लिहिण्यासाठी प्रथम तो भरपूर वाचन करतो, चौफेर वाचन करतो.त्यामुळे जगण्याकडे तो बारकाईने पाहतो आणि लेखन करतो.माझं लेखन माझ्या जगण्यातील अनुभव आहेत.किसना कथासंग्रहातील कथेतील पात्र हे वास्तवातील, आजूबाजूच्या परिसरातील आहेत, हे सांगून त्यांनी “अन् मी हिरो झालो” ही कथा सांगून विद्यार्थ्यांची मने जिंकली.
महाविद्यालयाचे प्राचार्य आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.बाबुराव घायाळ म्हणाले की,
पत्रकार, साहित्यिक आणि आपण सर्वजण मिळून आजची परिस्थिती सावरण्यासाठी प्रयत्न करूयात.वाचन अधिकाधिक गतीमान करण्यासाठी या निमित्ताने संकल्प करूयात आणि पुढे जाऊयात असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
कार्यक्रमाची प्रास्ताविक करताना वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमाची माहिती प्रा.डॉ.शंकर विभुते यांनी दिली.प्रमुख पाहुण्यांचे परिचय डॉ.हनुमंत भोपाळे यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.लक्ष्मण काळे तर आभार ग्रंथपाल डॉ.शिवराज देशमुख यांनी मानले. कार्यक्रमास महाविद्यालयातील
डॉ.नामदेव वाघमारे, डॉ.राजकुमार पवळे, डॉ.उमेशसिंह बायस, डॉ.जी.एस.पाटील,डॉ.हरिहार मोहोकार,प्रा . संतोष हापगुंडे व बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.