पर्यावरण संरक्षण ही लोक चळवळ व्हावी – डॉ. सूर्यप्रकाश जाधव
नेसुबो महाविद्यालयात वक्तृत्व आणि पतंगोत्सव स्पर्धा संपन्न

नांदेड/ काळाच्या ओघात पर्यावरणाचा ऱ्हास होत चालला आहे. याचा मानवी जीवनावर विघातक परिणाम होत आहे. पर्यावरणाचा समतोल आणि संरक्षणासाठी सर्वांनी एकत्र येऊन पर्यावरण रक्षण केले पाहिजे. पर्यावरणाचा समतोल राखणे काळजी गरज असून ती लोकचळवळ व्हावी असे आवाहन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सूर्यप्रकाश जाधव यांनी केले. अभिनव भारत शिक्षण संस्था संचलित नेताजी सुभाष चंद्र बोस महाविद्यालय व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने स्वामी विवेकानंद जयंती व राष्ट्रीय युवा दिनानिमित्त वक्तृत्व व पतंगोत्सव स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अभिनव भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.श्री. बालासाहेब पांडे, तर उद्घाटक म्हणून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सूर्यप्रकाश जाधव तर प्रमुख अतिथी म्हणून महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. महेंद्रकुमार कुलकर्णी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे. उप प्रादेशिक अधिकारी श्री. एन.पी. दारसेवाड व श्री.एम. एन.चलवा, उप-प्राचार्य डॉ. कल्पना कदम, माजी उप-प्राचार्य डॉ. दीपक कासराळीकर, उप-प्राचार्य डॉ. अर्चना भवानकर, पर्यावरण शास्त्र विभाग प्रमुख डॉ. आनंद आष्टुरकर यांची उपस्थित होती. कार्यक्रमाच्या समन्वयिका डॉ. जान्हवी शिऊरकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. महाविद्यालयाचा शैक्षणिक वाटचालीचा आढावा उप-प्राचार्य डॉ. अर्चना भवानकर यांनी घेऊन महाविद्यालयाची परंपरा आणि वारसा पाहुण्यांच्या समोर मांडला.
अध्यक्षीय भाषणात बालासाहेब पांडे म्हणाले की, प्रदूषण निर्माण करण्यासाठी आपणच जबाबदार आहोत. आज घडीला वेगवेगळ्या प्रकारच्या प्रदूषणामुळे मानवी जीवन धोक्यात आले आहे. प्रदूषण रोखण्यासाठी सर्वांनी याकडे कटाक्षाने लक्ष दिल्यास निश्चितपणे प्रदूषण टाळू शकतो असे ते म्हणाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सौ. योगिता बंगाळे यांनी केले तर आभार प्रा. विजय मठपती यांनी मानले. वक्तृत्व स्पर्धेचे परीक्षण डॉ. संतोष कोटुरवार, प्रा.क्षमा करजगावकर व प्रा. वर्षा भिसे यांनी केले तर पंतगोत्सव स्पर्धचे परीक्षण डॉ.बी.डी.वाघमारे, डॉ.आर.जी.उंबरकर व डॉ संध्या ठाकुर यांनी केले. या स्पर्धेसाठी नांदेड शहरातील विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. या कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
प्रति,
मा. संपादक,
दै…………..
उपरोक्त बातमी आपल्या लोकप्रिय दैनिकात प्रकाशित करून सहकार्य करावे ही विनंती.