श्रीरामचरित्र मानस *रामायण ग्रंथाचे संगीतमय पारायणाचे आयोजन
*
*
प्रतिनिधी / अनिल चव्हाण.
MCR.NEWS / MANAWAT
———————————————
मानवत शहरात दिनांक 9 जानेवारी ते 12 जानेवारी दरम्यान श्रीराम चरित्र मानस रामायण ग्रंथाचे संगीतमय वातावरणात पारायनाचे आयोजन करण्यात आले आहे.
सविस्तर वृत्त असे की,
मानवत नगर पालिकेचे माजी नगराध्यक्ष मा. संजय बिहारीलालजी बांगड यांच्या कुटुंबीयांच्या वतीने त्यांच्या निवासस्थानी गेल्या पंधरा वर्षा पासून पुणे निवासी *रामकथाकार* परमपूज्य श्री कमलेशजी महाराज यांच्या सुमधुरमय रसाळ वाणीतून व संगीताच्या सुरात श्रीरामचरित्र मानस रामायण ग्रंथाचे सामूहिक पारायणाचे आयोजन करतात. या वर्षी दिनांक 9 जानेवारी ते 12 जानेवारी दरम्यान येथील रविकुमार कत्रुवार यांच्या पेट्रोल पंपाजवळील संजय बांगड यांच्या शेतामध्ये श्रीरामचरित्र मानस रामायण ग्रंथाचे पारायणाचे आयोजन करण्यात आले आहे. या पारायणासाठी सहभाग घेणाऱ्या भाविक महिला व पुरुष रामायण प्रेमींनी सौ. आशाताई चांडक, सौ कौशल्याताई मंत्री.सौ सुजाताताई बांगड, व प्रणवजी बागंड यांच्याकडे नाव नोंदणी करावी.
असे आवाहन आयोजक सौ विजयाताई संजयकुमार बांगड यांनी केले आहे.
दिनांक 9 जानेवारी सकाळी सात वाजता लक्ष्मीनारायण मंदिर ते बागंड यांच्या शेता पर्यंत भव्य अशी शोभायात्रा काढण्यात येणार आहे. या भव्य शोभा यात्रेमध्ये मानवत शहरातील रामायण प्रेमी महिला व पुरुषांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन बांगड यांच्या वतीने करण्यात आले आहे. पारायणाची वेळ सकाळी 9 ते 12 व दुपारी 3 ते 6 या पारायणा मध्ये सहभागी होणाऱ्या भाविकांसाठी रचना कालणी , कटारी हनुमान मंदिर, व संजय बागंड यांच्या निवासस्थाना पासून मोफत ऑटो रिक्षाची व्यवस्था आयोजन समितीच्या वतीने करण्यात आली आहे.