राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने भागीत्रा गवळी यांचा सत्कार.
मानवत / अनिल चव्हाण.
mcr.new / manawat
—————————————
दिनांक ०७ जानेवारी २०२५ रोजी उक्कलगाव येथील चर्मकार समाजातील भागीत्रा मुंजाभाऊ गवळी ( भागीत्रा पांडुरंग केंदळे ) यांची प्राथमिक आरोग्य केंद्र पात्रुड -उपकेंद्र नित्रुड या ठिकाणी आरोग्य सेविका पदी नियुक्ती झाली. त्यांच्या या निवडी बद्दल राष्ट्रीय चर्मकार संघाच्या वतीने अभिनंदन करून सत्कार करण्यात आला. भागीत्रा गवळी यांनी १ जानेवारी २०२५ पासून आपल्या कार्यास सुरुवात केली आहे . राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष कार्यसम्राट माधवराव गायकवाड यांनी सौ.भागीत्रा गवळी यांना शुभेच्छा दिल्या तर राष्ट्रीय चर्मकार महासंघ परभणीच्या वतीने शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष एस.डी. ठोंबरे, राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे परभणी जिल्हाध्यक्ष मुरलीधर ठोंबरे, सत्यनारायण उनवणे, संघमित्रा अर्बन बँकेचे चेअरमन सुभाष घनघाव, लवुळ ग्रामपंचायत येथील माजी सरपंच बालासाहेब शिंदे, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रातील सहकारी यावेळी उपस्थित होते
***