जिल्हा क्रीडा स्पर्धेमध्ये मानवत नगर परिषद संघाने प्रथम पारितोषिक पटकाविले.* *जिल्हातून मानवत नगर परिषदेच्या खेळाडूवर अभिनंदनाचा वर्षाव
Correspondent / Anil chavan.
mcr.news / manawat.
—————————————————
नगर विकास विभाग महाराष्ट्र शासन आयोजित जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये वेगवेगळ्या खेळांच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
स्पर्धेचे उद्घाटन माननीय श्री रघुनाथ गावडे, जिल्हाधिकारी परभणी, माननीय श्री धैर्यशील जाधव, आयुक्त, महानगरपालिका परभणी, यांच्या हस्ते करण्यात आले होते. तीन दिवसीय चाललेल्या या स्पर्धांमध्ये वेगवेगळे खेळांचा समावेश होता.
या स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील सर्व नगर परिषद, नगरपंचायत व महानगरपालिका यांच्या अधिकारी कर्मचारी यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला होता. टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना मानवत नगर परिषद संघ आणि गंगाखेड नगर परिषद संघ यांच्यामध्ये झाला होता.
या अटीतटीच्या लढतीत मानवत नगर परिषद संघाने 82 रणांनी दणदणीत विजय मिळवला. या संघाचे कर्णधार कुशल नेतृत्व श्रीमती कोमल सावरे, मुख्याधिकारी तथा प्रशासक नगर परिषद, मानवत यांनी केले. संघातील सर्व खेळाडूंना विश्वासात घेत व प्रेरणा देत सर्व खेळाडूंच्या मदतीने कर्णधार यांनी विजयश्री खेचून आणला.
तर 8 षटकाच्या या सामन्यामध्ये सर्वप्रथम नाणेफेक जिंकून गंगाखेड नगर परिषद संघाने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला तर सर्व प्रथम फलंदाजी करताना मानवत संघाने 8 षटका मध्ये एकूण 129 धाव संख्या उभारली. या धाव संख्येचा पाठलाग करत असताना गंगाखेड नगर परिषद संघ 47 धाव संख्ये पर्यंतच मजल मारू शकला. मानवत नगरपरिषद संघाच्या खेळाडूमध्ये कर्णधार कोमल सावरे, पंकज पवार, सचिन सोनवणे, आलीम अन्सारी, संतोष खरात, महेश कदम, सय्यद अन्वर,शतानिक जोशी, प्रकाश हारकळ, मनमोहन बारहाते, संजय कुऱ्हाडे, राजेश भदर्गे,सागर गाडे, इत्यादी खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी बजावत विजयश्री खेचून आणला.
याबरोबर झालेल्या रस्सीखेच या स्पर्धेमध्ये सुद्धा मानवत नगर परिषद संघाने सेलू नगर परिषद संघास हरवत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. यावेळी मानवत नगर परिषद संघाला सहाय्य करण्यासाठी भगवानराव शिंदे, भागवत भोसले, शतानिक जोशी,संतोष उन्हाळे, एम. डी.पठाण, हनुमंत बिडवे, भारत पवार, रामराव चव्हाण, बळीराम दहे, नारायण व्यवहारे, रवी दहे, सोनाजी काळे, शेख जावेद, सुनील कीर्तने, दीपक भदर्गे, संजय दवणे, शाम दहे, निवृत्ती लाड, वंदना इंगोले, सुनिता वाडकर, गफ्फार शेख इत्यादी कर्मचारी अधिकारी यांचा सहभाग होता. मानवत नगर परिषद संघाने विजयश्री खेचून आणल्याने जिल्हातून मानवत नगर परिषदेच्या संघाचे कौतूक होत असून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
***