ताज्या घडामोडी

राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थी घडवणारी चळवळ -डॉ. शिवराज बोकडे

नांदेड:(दि.२९ सप्टेंबर २०२४)
” स्वच्छता ही सेवा” मोहिमेतंर्गत व राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन यांचे औचित्य साधून श्री.शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना कक्षातर्फे उद्बोधन शिबिर उत्साहात संपन्न झाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ.एच.एस.पतंगे तर प्रमुख वक्ते राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी तथा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजना कक्षाचे माजी संचालक व इतिहास विभागप्रमुख डॉ.शिवराज बोकडे होते
भारत सरकार युवा कार्य एवं खेल मंत्रालय रासेयो क्षेत्रीय निदेशालय, पुणे यांच्या निर्देशानुसार दि.१७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान ‘स्वच्छता ही सेवा’ मोहीम पार पडण्यात येत आहे. या अंतर्गत सार्वजनिक व ऐतिहासिक स्थळे, शाळा, कॉलेज परिसर, स्वच्छता तसेच जनजागृती रॅली उदबोधन शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. जेणेकरून लोकांमध्ये स्वच्छतेविषयी जनजागरण होईल.
या मोहिमेंतर्गत माजी प्र- कुलगुरु तथा विद्यमान प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार रासेयो कक्षातर्फे राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन व उद्बोधन शिबिर संपन्न झाले.
याप्रसंगी डॉ. शिवराज बोकडे यांनी मनोगतात, राष्ट्रीय सेवा योजना स्थापना आणि उद्दिष्टांची माहिती दिली तसेच त्यांनी कार्यक्रमाधिकारी कार्यकाळातील आठवणींना उजाळा दिला.
ते पुढे म्हणाले की, राष्ट्रीय सेवा योजना ही एक विद्यार्थी घडवणारे चळवळ आहे. यातून विद्यार्थ्यांचा परिपूर्ण विकास होतो.
अध्यक्षीय मनोगतामध्ये डॉ. हरिश्चंद्र पतंगे यांनी, राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थ्यांच्या महाविद्यालयीन जीवनातील एक अत्यंत महत्त्वाची संघटना आहे. त्याद्वारे आपण अनेक सामाजिक व सार्वजनिक उपक्रम राबवू शकतो, असे प्रतिपादन केले
प्रारंभी कार्यक्रमाधिकारी डॉ. कैलास इंगोले यांनी प्रास्ताविक केले.सूत्रसंचालन गणेश विनकरे यांनी केले. प्रमुख वक्त्यांचा परिचय सविता निखते यांनी करून दिला तर आभार श्रीनाथ राऊत यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यक्रमाधिकारी डॉ.कैलास इंगोले, डॉ.राजरत्न सोनटक्के, प्रा.राजश्री भोपाळे, कनिष्ठ महाविद्यालयाचे कार्यक्रमाधिकारी प्रा.अभिनंदन इंगोले, प्रा.श्रीराम हुलसुरे, प्रा.कांचन गायकवाड, प्रा.प्रियंका सिसोदिया आणि स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.
या उपक्रमासाठी प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, प्रसिद्धी समन्वयक डॉ.अजय गव्हाणे आदींनी सहकार्य केले.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.