ताज्या घडामोडी

नवकवी राजेश घणघाव यांच्या कवीता गायनाने विद्यार्थी मंत्रमूग्ध मी

मानवत / प्रतिनिधी.

रत्नापूर शाळेत विविध उपक्रम घेऊन केला साजरा ”मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा” टप्पा -2 या उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद प्राथ. शाळा रत्नापूर येथे मुलांना शिकण्याची गोडी व शाळेविषयी आवड निर्माण होण्यासाठी शाळेमधे कविता गायनाचा कार्यक्रम घेण्यात आला. नवकवी कवीवर्य श्री. राजेशजी घनघाव यांनी शिक्षण विषयक जनजागृती निर्माण करणार्‍या व महापुरुषांच्या जीवनावर आधारित कविता सादर केल्या.
मुलांनीही त्यांना टाळ्या वाजवून साथ दिली. तसेच संगीतमय कवायत, योगासने, वाद-विवाद स्पर्धा, महावाचन विद्यार्थ्यांसह शिक्षकांनीही केले. कवी शाळेचा हिरवागार परिसर बघून आनंदित झाले. कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री. चंद्रकांत पौळ यांच्यासह शिक्षक उपस्थित होते.

**

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.