ताज्या घडामोडी

मानवत येथे मार्क्सवादी कम्युनिस्ट (लाल बावटा} पक्षाच्या कार्यकर्ता मेळावा संपन्न

मानवत येथे मार्क्सवादी कम्युनिस्ट (लाल बावटा} पक्षाच्या कार्यकर्ता मेळावा संपन्न

मानवत / प्रतिनिधी.

मानवत येथे आज तापडिया लॉजवर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष लाल भावटा पक्षाच्या वतीने कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
सविस्तर वृत्त असे की,
मानवत तालूक्यातील माकपाच्या लाल बावटा युनियनच्या वतीने आज दिनांक ८ जुलै रोजी दुपारी दोन वाजता येथील तापडिया लाॅज च्या सभागृहावर घेण्यात आलेल्या मेळाव्यामध्ये सामाजिक प्रश्नासोबतच राजकीय विश्लेषण सुद्धा करण्यात आले होते. आज मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे वतीने मानवत तालुक्यातील पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा तापडिया लॉज येथे कॉ अशोक बुरखुडें यांच्या अध्यक्षतेखाली कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्ताच्या अध्यक्षतेखाली मेळावा संपन्न झाला या मेळाव्यात मानवत तालुक्यातील शेतकरी, कामगार, शेतमजूर यांच्या प्रश्न घेऊन क्रांतिसिह नाना पाटील यांच्या जयंती निमित्त दि 3/8/2024 रोजी पाथरी उपजिल्हाधिकारी कार्यालय पाथरी वर मोर्चा काढण्यात येणार आहे , पिक विमा, घरकुल योजना ग्रामीण 2.50 लाख रुपये मिळाले पाहिजे,गायरान धारकांच्या नावे मालकी हक्क मिळाला पाहिजे, शेतकर्‍याचे संपुर्ण कर्ज माफ करा,हातलवाडी व बोदरवाडी गावात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करा पाथरी विधानसभा मतदारसंघ सहित महाविकास आघाडी कडे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य कमेटीने 12 जागा माकपला सोडाव्यात अशी मागणी करण्यात आली. पाथरी विधानसभा मतदारसंघ उमेदवार कॉ दिपक लिपणे हे आहेत या मेळाव्याला मार्गदर्शन कॉ उद्धव पौळ, कॉ रामकृष्ण शेरे पाटील कॉ दिपक लिपणे कॉ रामेश्वर पौळ कॉ अशोक बुरखुडें कॉ रामराजे महाडिक यांनी केले हा मेळावा यशस्वी करण्यासाठी लिंबाजी धनले कॉ कुंडलिक थिटे कॉ रामेश्वर वाघमारे, कॉ राणबा कांबळे, संतोष मगर यांच्या सह पदाधिकारी व कार्यकर्ते या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.