ताज्या घडामोडी

अधिकृत महा -ई- सेवा केंद्रावरूनच *मुख्यमंत्री* लाडकी बहिन योजनेचा प्रस्ताव दाखल करावा.तहसिलदार > पांडूरंग माचेवाड.

मानवत / प्रतिनिधी.

राज्याचे सक्षम व कर्तव्यदक्ष मूख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, यांनी राज्यातील महिला भगिणिना भेट म्हणून *मूख्यमंत्री लाडकी बहिन या योजनेच्या माध्यमातून राज्यातील महिलांना दर माहा पंधराशे रूपये अनूदान देण्याची घोषणा करून प्रस्ताव दाखल करण्याचे आवाहन केल्यामूळे राज्यासह मानवत तालूक्यातील सेतू सेवा महासंचालकाच्या केंद्रावर तोबा गर्दी होत असून मानवत शहरातील मान्यता कृत ई- महासेवा केंद्रावरच प्रसाव सादर करावे असे आवाहन मानवत तहसिलचे तहसिलदार पांडूरंग माचेवाड यांनी केले आहे.
मानवत शहरातील सेतू सुविधा केंद्रावर उत्पन्न व रहिवासी प्रमाण पत्राचा अर्ज करण्यासाठी तहसील कार्यालयात गर्दी होत आहे. असे मत उत्पन्न व रहिवासी प्रमाणपत्र साठी गावातील महा ई सेवा केंद्रावरून अर्ज केल्यानंतर त्यास ऑनलाइन मान्यता मिळते व प्रमाणपत्राची प्रत त्याच केंद्रावर अर्जदारास मिळते त्यामुळे अर्जदाराला तहसील कार्यालयात येण्याची आवश्यकताच पडत नाही. महिला व बालविकास विभागाच्या दिनांक 3 जुलै 2024 च्या शासन निर्णयानुसार हे दोन्ही प्रमाणपत्र अनिवार्य राहिली नाहीत. योजनेच्या अधिक माहितीसाठी महिला व बालविकास अधिकारी मानवत यांना संपर्क करावा.
महा-ई-सेवा केंद्र व सीएससी चालक यांना लाडकी बहीण योजनेच्या अनुषंगाने यापूर्वी सूचना देण्यात आलेल्या आहेत तरीसुद्धा कुणी जास्तीच्या पैशाची मागणी केल्यास तक्रार करावी खात्री करून कारवाई केल्या जाईल. लाभार्थ्यांनी प्रमाणपत्रासाठी अधिकृत महा-ई-सेवा केंद्रावरूनच अर्ज करावेत यासाठी कोणत्याही मध्यस्थला भेटण्याची किंवा पैसे देण्याची आवश्यकता नाही. असे आवाहन मानवत तहसिलचे तहसिलदार पांडूरंग माचेवाड यांनी केले आहे.

..

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.