ताज्या घडामोडी

मंदीर समितीचे अध्यक्ष विनोद आसोरे यांच्या हस्ते राष्ट्रिय चर्मकार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष माधवराव गायकवाड यांचा पेडगांव येथे सत्कार

मानवत / प्रतिनिधी.

राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष कार्यसम्राट मा.श्री माधवराव गायकवाड यांनी पेडगाव येथील संत शिरोमणी गुरु रविदास महाराज मंदिर येथे धावती भेट दिली व मॅदिर बांधकामासह सामाजीक उपक्रमाचा आढावा घेतला आणि समाजातील विविध प्रश्नावर पदाधिकारी यांचे मत जाणून घेतली. यावेळी त्यांच्यासोबत युवा उद्योजक इंजिनिअर विशाल बनसोडे व राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे परभणी जिल्हा अध्यक्ष मुरलीधरजी ठोंबरे, विनोद असोरे , राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे वसमत तालुकाध्यक्ष मारोती चव्हाण,उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते संत शिरोमनी श्रो गुरु रविदासजी महाराज यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी मंदिर समिती च्या वतीने माधवरावजी गायकवाड यांचा व इंजि. विशालजी बनसोडे यांचा आदरसन्मानपूर्वक शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी पेडगाव येथील चर्मकार समाजाचे विविध प्रश्न व समस्या यावर सविस्तर चर्चा करण्यात आली यावेळी ज्येष्ठ समाजसेवक नामदेव लोकरे, मंदिर समिती अध्यक्ष विनोद असोरे, मंदिर समिती उपाध्यक्ष गोविंद असोरे, राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे परभणी तालुका अध्यक्ष माऊली लोकरे, मारोती असोरे, संपूर्ण समितीचे सन्माननिय सदस्य व समस्त चर्मकार समाज बांधव यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते,तर शेवटी प्रदेशाध्यक्ष श्री माधवराव गायकवाड साहेब यांनी विनोद असोरे यांच्या आराध्य बेकरी अँड स्वीट मार्टला भेट देऊन व्यवसायीक जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.

**

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.