ताज्या घडामोडी

ऊभ्या टॅक्टर ट्राॅलीला धडकल्याने पांडूरंगाचा मृत्यू.

वाहन चालकांच्या निष्काळजी पणामुळे युवकाचे गेले प्राण मानवत पो.स्टे मध्ये गून्हा दाखल.

मानवत // प्रतिनिधी.

रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला धडकुन दुचाकी चालक १८ वर्षीय युवकाचा मृत्यु झाला. ही घटना बुधवार २९ मे रोजी सायंकाळी साडे सात वाजेच्या सुमारास मानवत ते नागरजवळा रोडवर घडली. युवकाच्या अपघाती मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी ट्रॅक्टर चालकावर मानवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की,
पांडूरंग बालासाहेब होंगे वय १८ वर्ष रा. नागरजवळा असे मयताचे नाव आहे. याप्रकरणी विठ्ठल बाबासाहेब होंगे यांनी तक्रार दिली आहे. आरोपी ट्रॅक्टर क्रमांक एमएच २१ डि ३५६८ च्या चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन रोडवर धोकादायक स्थितीत कोणतीही काळजी न घेता उभे केले होते. या ट्रॅक्टर ट्रॉलीली धडकून पांडूरंग होंगे याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच मानवत पोलीस ठाण्याचे नूतन कर्तव्यदक्ष पोलिस निरिक्षक संदिप बोरकर, पोउपनी पाटील, पोह भारत नलावडे, पोका बंकट लटपटे, विजय लबडे, शिंदे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देवून मृतदेह ताब्यात घेत शव विच्छेदनासाठी मानवत ग्रामीण रुग्णालयात पाठविला. प्रकरणाचा तपास मानवत पो.स्टेचे पोलिस उपनिरिक्षक पाटील हे करीत आहे.

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.