मानवत तालूक्यासह मानोली परिसरात शेतीच्या पेरणी पूर्व मशागतीच्या कामाला आला वेग
![](https://mcrnews.in/wp-content/uploads/2024/05/IMG-20240522-WA0009.jpg)
मानवत / प्रतिनिधी.
मानवत तालुक्यासह तालूक्यातील मानोली परिसरात पावसाळा 10 ते 15 दिवसावर येऊन ठेपला आहे त्यामुळे तालूक्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामापूर्वी शेतीची मशागत करण्याच्या कामाला सुरुवात झाली असून मशागतीच्या कामाला वेग आल्या असल्याचे चित्र मानोली सह तालूक्यात ठिक ठिकानी पाहावयास मिळत आहे.
गेल्या वर्षी पावसाळा वेळेवर सुरू झाला होता. त्यामुळे तालूक्यातील शेतकऱ्यांनी लगेच पेरणी केली होती. यावर्षी सुद्धा पावसाळा वेळेवर सुरू होईल या आशेने शेतकरी पेरणीपूर्व मशागतीच्या कामाला लागला आहे मशागतीची कामे वेगाने व्हावी यासाठी बैलजोडी ऐवजी ट्रॅक्टर व इतर आधुनिक यंत्राचा वापर केला जात आहे तर काही शेतकरी मात्र बैल जोडीद्वारे शेतीची मशागत करताना पाहावयास मिळत आहेत
**